Tuesday, June 30, 2020

KESHAVA NAAMAARTHA ( केशवादि नामार्थ )

श्रीगुरुभ्योनमः

संध्यावंदन किंवा कोणत्याही कार्यारंभी संकल्प करतात तेंव्हा केशवादि चोवीस नाम घेतात. विष्णूसहस्रनाम असो वा केशवादि चतुर्विंशती (चोवीस) नाम असो त्या नामाचा अर्थ समजल्यामुळे आनंद द्विगुणीत होतो म्हणून केशवादि नामांचा अर्थ जाणून घेण्याचा अल्पसा प्रयत्न. 

केशव  

केशव शब्दाची व्याख्या अशी केली आहे.  कश्च इशश्च केशौ,
तौ सृष्ट्यादिना वर्तयति इति केशवः    कः म्हणजे ब्रह्मदेव 
इश म्हणजे महादेव या दोघांना सृष्टीच्या व्यापारासाठी (उत्पती व लय) जो प्रवृत्त करतो तो केशव.
हिरण्यगर्भः कः प्रोक्तः इशः शंकर एव च सृष्ट्यादिना वर्तयति तौ यतः केशवः भवान् .
केशे वर्तते इति केशवः म्हणजे प्रलयकालीन उदकात,पाण्यात रहाणारा म्हणून तो केशव.(महोदधिशयोंतकः)
नारायण
नारायण या शब्दाचा विग्रह   न  अर  अयन असा केला जातो.
न अराः नाराः 
नाराणां अयनः नारायणः अर म्हणजे दोष .
ज्याचे ठिकाणी दोष नाहीत अर्थात गुण आहेत .सर्व गुणांचे अयन म्हणजे आश्रयस्थान म्हणजे नारायण.
नार याचा दुसरा अर्थ ज्ञान असाही होतो. जो ज्ञानाचा आश्रय आहे तो नारायण.
आपो नारा इति प्रोक्ता आपो वै नरसुनवः अयनं तस्य ताः पुर्वं तेन नारायणः स्मृतः
आप म्हणजे पाणी व पाण्यात रहाणारा ,क्षीरसागर मधे रहाणारा तो नारायण.
आप म्हणजे जीवश्रेष्ठ वायुदेव त्यांना आश्रयस्थान असणारा नारायण.
असा तो नारायण  सर्व गुणांनी युक्त(गुणैःसर्वैं उदीर्णं) व दोषदूर (दोषवर्जितं)  सर्व शास्त्रांनी  ज्ञेय आहे व मुक्त जीवांना प्राप्य (गम्य) असा आहे.
माधव
माया धवः माधवः
माया म्हणजे महालक्ष्मी
तिचा धवः म्हणजे पती लक्ष्मीपती .
माधव म्हणजे लक्ष्मीपती.
मधु कुलात उत्पन्न झालेला या अर्थानेही माधव.
गोविन्द
गोभिः वेद्यते इति गोविंदः 
गां वेदलक्षणां वाणीं विंदत इति गोविंदः .
वेदांचे द्वारे जो जाणल्या जातो तो गोविंद .
२ गवां अविं द्यति इति गोविंदः 
वेदांच्या द्वारे अज्ञानाला  नष्ट करणारा तो गोविंद.
३ गवां विंदयति इति गोविंदः 
गायींना आनंद देणारा ,रमविणारा तो गोविंद.
गौरेषा तु तथा वाणी तां तु विंदयते भवान्
गोविंदस्तु ततो देव मुनिभिः कथ्यते भवान्
गायी व वेद यांना आनंद देणारा तो गोविंद.
श्रीकृष्ण लहान असताना गोवर्धनपर्वतोद्धारानंतर इंद्राने पश्चात्ताप पावून आकाशगंगा व सुरभी गोमातेच्या दुधाने कृष्णास अभिषेक करुन त्याला *गोविंद*  असे नामाभिधान दिले.
फाल्गुन महिन्यांचा मासनियामक, मासाभिमानी  देवता 
गोविंद आहे.
जेवण करत असताना  गोविंद गोविंद असे नाम म्हणतात.
विष्णु
सर्वत्र व्याप्तत्वात् 
सर्वेषु प्रविष्टत्वात् 
विष्णु नाम.
सर्वत्र व्यापून राहिलेला आहे
तसेच सर्वांचे ठिकाणी प्रवेश करतो म्हणून तो विष्णु.
यज्ञो वै विष्णुः असे म्हणले आहे.अर्थात यज्ञ हे विष्णुचेच रुप आहे.
सर्व नावे ही विष्णुचीच वाचक आहेत 
"नामानि सर्वाणियमाविशंती तं वै विष्णुः परम मुदाहरन्ति".
चैत्र महिन्याची मासनियामक देवता
विष्णु होय.
सर्वही कार्ये विष्णुच्या नामस्मरणाने परिपुर्ण होतात म्हणून कार्यसंपताना
"विष्णुस्मरणात् परिपूर्णतास्तु"
असे म्हणले जाते.
 मधुसूदन
मधु दैत्यं सूदयति इति मधुसूदनः
मधु नामक दैत्य मर्दनः
मधु नावाच्या दैत्याला विष्णुने मारले म्हणून त्याला "मधुसूदन " हे नांव मिळाले.
मधु व कैटभ नावाच्या दोन दैत्यांना विष्णुने मारले होते. 
त्रिविक्रम
त्रिविधाः क्रमः यस्य सः त्रिविक्रमः
तीन प्रकारांनी ज्याचा पादविक्षेप होतो असा.
तीन पाउलांनी ज्याने त्रैलोक्य, ब्रह्मांड आक्रमिले आहे असा तो त्रिविक्रम .
याला उरुक्रम असेही म्हणले आहे:-
ज्येष्ठ महिन्याची मासनियामक देवता 
त्रिविक्रम आहे.
त्रिविक्रम निष्क्रम विक्रम वंदे 
संक्रम सुक्रम हुंक्रत वक्त्र 
असे म्हणून मध्वाचार्य द्वादशस्तोत्रात त्रिविक्रमरुपी परमात्माला वंदन करतात:-
वामन
वामैः नियमति इति वामनः
मंगलमय वाणीने सर्वांचे कल्याण करतो तो "वामन".
बली चक्रवर्तीच्या यज्ञात बटुरुपाने ,नुकत्याच उपनयन झालेल्या ,बुटक्या,कमी उंचीच्या रुपात आलेला तो वामन.
बली राजाने इंद्राचे हरण केलेले राज्य 
बलीकडून  दानस्वरुपात घेवून इंद्राला परत न करणारा.
आषाढ महिन्याचा मासनीयिमक वृषाकपि वामन.
श्रीधर
श्री म्हणजे लक्ष्मीदेवीला धारण करणारा म्हणून तो श्रीधर.
लक्ष्मीला आश्रय असणारा श्रीधर. लक्ष्मीदेवीला वक्ष स्थळावर धारण करणारा श्रीधर.
श्रावण महिन्याचा मासनियामक श्रीधर.
श्रीधर श्रीधर शंधर वंदे भूधर वार्धर कंधर धारिन असे म्हणून मध्वाचार्य श्रीधर परमात्म्याला वंदन करतात.
हृषिकेश
हृषीकाणां इशः हृषिकेशः
हृषिक म्हणजे इंद्रिये
इंद्रियाभिमानी देवतांचा स्वामी तो हृषीकेश.
सर्व इंद्रियांचा नियामक तो हृषीकेश .
इंद्रियांना प्रेरणा देणारा.
प्रत्येक इंद्रियाभिमानी एक देवता असते व त्या देवतेच्या त्याइंद्रियाचे ठिकाणी  असण्यामुळे त्या त्या इंद्रियाचे कार्य सुचारु रुपाने चालते.
उदा.  चक्षुरिंद्रायाची अभिमानी देवता सूर्य  .डोळ्याचे ठिकाणी सूर्य राहील तर डोळ्यांना व्यवस्थित दिसेल नाहीतर व्यक्ती अंध होईल.
अशा सर्व इंद्रियाभिमानी देवतांचा ईश हृषीकेश परमात्मा आहे.
भाद्रपद महिन्याचा मासनियामक हृषीकेश आहे.
पद्मनाभ
पद्मं नाभौ यस्य सः पद्मनाभः
ज्याचे नाभीतून कमल आले आहे असा तो पद्मनाभ .
क्षीरसागर समुद्रात शेषशायी परमात्म्याचे नाभीतून कमल निर्माण झाले म्हणून तो पद्मनाभ.
(या कमलातून ब्रह्मदेवाची उत्पत्ती झाली. कमलोद्भव ,कमलज असे ब्रह्मदेवाला म्हणले जाते.)
अश्विन महिन्याचा मासनियामक  पद्मनाभ  आहे.
दामोदर
दाम उदरे यस्य सः 
दामोदरः  .
यशोदेने कृष्णाला एका दोरीने उखळाला बांधल्याची कथा सर्वांना विदित आहेच.दोरीने कृष्णाच्या उदराला बांधले म्हणून त्याला दामोदर असे नांव मिळाले.
वास्तविक परमात्माला कुणीही बांधून ठेवू शकत नाही हे कृष्णाने प्रत्येक वेळी दोन अंगुले दोरी कमी पडली यातून सुचित केले परंतु तो परमात्मा भक्तांना केवळ भक्तीचे द्वारा (माहात्म्य ज्ञान पुर्वस्तु सुदृढः सर्वतोधिकः स्नेहः=भक्ती)
वश होतो हे दाखविण्यासाठी यशोदेकडून ,आपल्या अनन्य भक्ताकडून बांधवून घेतला. *अहं भक्तपराधीनः* असेही भगवंतांनी  दुर्वासांना सांगितले होतेच.
 कार्तिक महिन्याचा मासनियामक दामोदर आहे म्हणून कार्तिक द्वादशीला तुलसी विवाह दामोदराशी लावण्याची परंपरा निर्माण झाली.
संकर्षण
सम्यक कर्षयति इति संकर्षणः
मुमुक्षुंच्या सर्व कर्मांचा नाश करतो तो संकर्षण .
कर्षण केलेला म्हणजे ओढून नेलेला या अर्थाने .
देवकीच्या गर्भातून कर्षण करुन रोहिणीच्या गर्भात स्थापन केला गेला (योगमायेच्या द्वारा) तो भगवंताचा शुक्लकेशावतार
संकर्षणश्च बभूव पुनः सुनित्यः
संहारकारणवपुस्तदनुज्ञयैव ||
देवी जयेत्यनु बभूव स सृष्टीहेतोः प्रद्युम्नतामुपगतः कृतितां च देवी.
(मभा तात्पर्य निर्णय अध्याय १)
ब्रह्मांडाच्या संहाराला कारणीभूत असणारे संकर्षण रुप विष्णूने घेतले.
अनिरुद्ध प्रद्युम्न *संकर्षण* वासुदेव हे परमात्म्याचे "चतुर्व्युह " आहे.
असे हे संकर्षण स्वरुप.
वासुदेव
वसन्ति भूतानि यस्मिन् इति वासुः
वासुश्चासौ देवश्च वासुदेवः
सर्व भूतांना प्राणिमात्रांना आश्रय असणारा व क्रीडादिगुणविशिष्ट असा वासुदेव परमात्मा.
वसुदेवस्य अपत्यं पुमान् वासुदेवः
वसुदेव याचा मुलगा म्हणून तो वासुदेव.

प्रद्युम्न अनिरुद्ध संकर्षण वासुदेव या चतुर्व्युहातील एक वासुदेव.
प्रद्युम्न
प्रकृष्टं द्युम्नं यस्य सः प्रद्युम्नः
ज्याचे तेज उत्कृष्ट आहे असा तो प्रद्युम्न.
द्युम्न म्हणजे धन ,विपुल धन ज्याचेपाशी आहे असा.
चतुर्व्युहातील  एक परमात्मा प्रद्युम्न
"संकर्षणश्च स बभूव पुनः सुनित्यः संहारकारणवपुस्तदनुज्ञयैव ||
देवी जयेत्यनु बभूव स सृष्टीहेतोः
प्रद्युम्नतामुपगतः कृतितां च देवी ||
नारायण परमात्म्याने सृष्टी उत्पन्न करण्यास्तव प्रद्युम्न रुप घेतले तर लक्ष्मीदेवीने कृति रुप घेतले.
मभातानिर्णय 
असे हे प्रद्युम्नस्वरुप.
अनिरुद्ध
अनिभिः रुध्यते इति अनिरुद्धः
भक्तांकडून त्यांचे हृदयात कोंडला जातो तो अनिरुद्ध .
भागवतात परमात्मा भक्तांचेद्वारा हृदयात कोंडला जातो तो.
सद्योरुध्यवरुध्यतेsत्र कविभिः शुश्रुशुभिस्तत्क्षणात्.
ज्याला कुणीही विरोध करु शकत नाही असा अनिरुद्ध 
ज्याला कुणीही अडवू शकत नाही असा अनिरुद्ध .
"स्थित्यै पुनः स भगवान्   अनिरुद्ध
नामादेवी च शांतिरभवत् शरदां सहस्रम्||
नारायणाने सृष्टीच्या रक्षणार्थ अनिरुद्ध नामक रुप घेतले तर लक्ष्मीदेवीने *शांति* असे रुप  घेतले.(महाभातानिर्णय )
असे हे अनिरुद्ध स्वरुप.
पुरुषोत्तम
पुरुषेशु उत्तमः पुरुषोत्तमः
क्षर व अक्षर यांचेपेक्षाही श्रेष्ठ असणारा.
क्षर म्हणजे नाशिवंत व अक्षर म्हणजे अविनाशी.
अक्षर म्हणजे अविनाशी महालक्ष्मी.
यस्मात् क्षरमतीतोsहं अक्षरात् अपि चोत्तमः अतोsस्मि लोके वेदेच प्रथितः पुरुषोत्तमः
अशी पुरुषोत्तम शब्दाची व्याख्या गीतेत स्वतः भगवंतांनी केली आहे.
असा हा पुरुषोत्तम .
म्हणजेच हरि   सर्वोत्तम
अधोक्षज
अधः कृतानि अक्षजानि येन सः 
अधोक्षजः 
ज्यांचेमुळे इंद्रियांचे  विषय नाहीसे होतात तो अधोक्षज .
कधीही क्षीण न होणारा तो अधोक्षज 
पृथ्वी व अंतरिक्षात विराट स्वरुपाने रहाणारा तो अधोक्षज  परमात्मा.
नरसिंह
नरश्चासौ सिंहश्च नरसिंहः
न रीयते इति नरः
हिनस्ति इति सिंहः
जो नाश पावत नाही व जो दैत्यांचा नाश करतो तो नरसिंह.
आपला भक्त प्रल्हाद याचे वचन सत्य ठरविण्यासाठी व परमात्मा सर्वव्यापी आहे दर्शविण्यासाठी घेतलेले रुप.
या रुपात शरीर नर,मानवाचे तर डोके सिंहाचे असे स्वरुप घेवून ब्रह्मदेवाने हिरण्यकशिपुला दिलेल्या सर्व वरांच्या पलीकडे जावून त्याचा वध केला.
"सत्यं विधातुं निजभृत्यभाषितं व्याप्तिं च भूतेष्वखिलेषू चात्मनः||
अदृश्यतात्यद्भूत रुपमुद्वहन् स्तंभे सभायां न मृगं न मानुषम् ||
असे हे नरसिंहस्वरुप.
अच्युत
अच्युत म्हणजे अविनाशी . 
सर्व विकारांनी रहित असणारा, न घसरणारा,
जसाच्या तसा रहाणारा. अच्युत नामक परमात्मा .
जनार्दन
जनान् अर्दयति इति जनार्दनः
सज्जनांना सद्गती देतो म्हणून तो जनार्दन .
न जायत इति जनः
संसारम् अर्दयति इति जनार्दनः
जनांच्या भवसागराचा,संसारसागराचा नाश करणारा तो जनार्दन .उपेन्द्र
उपेन्द्र.
इंद्राचा अनुज  
आदितीचा पुत्र म्हणून अवतार घेवून इंद्राचे बलीने हरण केलेले राज्य बलीचक्रवर्ती कडून दान घेवून इंद्राला परत देणारा तो
हरि
हरति इति हरिः
भक्तांचे दुःख हरण करतो ,भक्तांचे दुःख दूर करतो तो हरि.
अज्ञानरुप कारणासहित संसार नाहीसा करणारा तो हरि.
श्रीकृष्ण
कर्षति इति कृष्णः
दैत्यांना नरकात ओढतो असा कृष्ण.
परिपूर्ण ज्ञानानंदात्मक स्वरुपवान आहे असा तो कृष्ण.
ज्याचा वर्ण काळा आहे असा.
जो सच्चिदानंदस्वरुपी आहे व जो लोकांना आपल्याकडे आकर्षून घेतो तो श्रीकृष्ण.
असे हे थोडक्यात केशवादि चोवीस नावांचे अर्थ.
प्रत्येक नावाचे अनेक अर्थ असतात .
अर्थ न समजून घेता केलेले कर्म निरर्थक होते
व्यासस्मृतीत म्हटले आहे 
वेदस्याध्ययनं कार्यं धर्मशास्त्रस्य वापि यत्||
अजानतार्थं तत्सर्वं तुषाणां कंडनं यथा||
यथा पशुर्भावाही न तस्य लभते फलं
द्विजस्तथार्थानभिज्ञो न वेद फलमश्रुते||
वेदांचे व धर्मशास्त्राचे अध्ययन ब्राह्मणाने केले पाहिजे .हे अध्ययन अर्थानुसंधान रहित असेल तर तांदळाच्या कोंड्याप्रमाणे निरर्थक होय,धान्याचे ओझे वाहणाऱ्या पशूला जसा धान्याचा उपयोग नसतो तद्वत अर्थ न जाणणार्यांला इष्ट फळ मिळत नाही.

ಸೌಜನ್ಯದಿಂದ....

ಈಶ ನಿನ್ನ ಚರಣ ಭಜನೆ | ಆಶೆಯಿಂದ ಮಾಡುವೆನು |
ದೋಷರಾಶಿ ನಾಶಮಾಡು ಶ್ರೀಶ ಕೇಶವ ||

ಶರಣು ಹೊಕ್ಕೆನಯ್ಯ ಎನ್ನ | ಮರಣ ಸಮಯದಲ್ಲಿ ನಿನ್ನ |
ಚರಣ ಸ್ಮರಣೆ ಕರುಣಿಸಯ್ಯ ನಾರಾಯಣ ||೧||
ಶೋಧಿಸೆನ್ನ ಭವದ ಕಲುಷ | ಭೋಧಿಸಯ್ಯ ಜ್ಞಾನವೆನಗೆ||
ಬಾಧಿಸುವ ಯಮನ ಬಾಧೆ | ಬಿಡಿಸು ಮಾಧವ ||೨||
ಹಿಂದನೇಕ ಯೋನಿಗಳಲಿ | ಬಂದು ಬಂದು ನೊಂದೆನಯ್ಯ ||
ಇಂದು ಭವದ ಬಂಧ ಬಿಡಿಸೋ ತಂದೆ ಗೋವಿಂದ ||೩||
ಭ್ರಷ್ಟನೆನಿಸಬೇಡ ಕೃಷ್ಣ | ಇಷ್ಟು ಮಾತ್ರ ಬೇಡಿಕೊಂಬೆ ||
ಶಿಷ್ಟರೊಡನೆ ಇಟ್ಟು ಕಷ್ಟ | ಬಿಡಿಸು ವಿಷ್ಣುವೇ ||೪||
ಮದನನಯ್ಯ ನಿನ್ನ ಮಹಿಮೆ | ವದನದಲ್ಲಿ ನುಡಿಯುವಂತೆ ||
ಹೃದಯದಲ್ಲಿ ಹುದುಗಿಸಯ್ಯ ಮಧುಸೂದನ ||೫||
ಕವಿದುಕೊಂಡು ಇರುವ ಪಾಪ | ಸವೆದು ಪೋಗುವಂತೆ ಮಾಡಿ ||
ಜವನ ಬಾಧೆಯನ್ನು ಬಿಡಿಸೋ | ಶ್ರೀತ್ರಿವಿಕ್ರಮ ||೬||
ಕಾಮಜನಕ ನಿನ್ನ ನಾಮ | ಪ್ರೇಮದಿಂದ ಪಾಡುವಂಥ ||
ನೇಮವೆನಗೆ ಪಾಲಿಸಯ್ಯ ಸ್ವಾಮಿ ವಾಮನ ||೭||
ಮೊದಲು ನಿನ್ನ ಪಾದಪೂಜೆ | ಒದಗುವಂತೆ ಮಾಡೋ ಎನ್ನ ||
ಹೃದಯದೊಳಗೆ ಸದನ ಮಾಡು ಮುದದಿ ಶ್ರೀಧರ ||೮||
ಹುಸಿಯನಾಡಿ ಹೊಟ್ಟೆ ಹೊರೆವ | ವಿಷಯದಲ್ಲಿ ರಸಿಕನೆಂದು ||
ಹುಸಿಗೆ ಹಾಕದಿರೋ ಎನ್ನ ಹೃಷೀಕೇಶನೇ ||೯||
ಕಾಮಕ್ರೋಧ ಬಿಡಿಸಿ ನಿನ್ನ | ನಾಮ ಜಿಹ್ವೆಯೊಳಗೆ ನುಡಿಸು ||
ಶ್ರೀಮಹಾನುಭಾವನಾದ ದಾಮೋದರ ||೧೦||
ಬಿದ್ದು ಭವದನೇಕ ಜನುಮ | ಬದ್ದನಾಗಿ ಕಲುಷದಿಂದ ||
ಗೆದ್ದು ಪೋಪ ಬುಧ್ಧಿ ತೋರೊ ಪದ್ಮನಾಭನೆ ||೧೧||
ಪಂಕಜಾಕ್ಷ ನೀನೆ ಎನ್ನ | ಮಂಕುಬುದ್ಧಿಯನ್ನು ಬಿಡಿಸಿ |
ಕಿಂಕರನ್ನ ಮಾಡಿಕೊಳ್ಳೋ ಸಂಕರ್ಷಣ ||೧೨||
ಏಸು ಜನ್ಮ ಬಂದರೇನು | ದಾಸನಲ್ಲವೇನು ನಾನು ||
ಘಾಸಿ ಮಾಡದಿರು ಇನ್ನು ವಾಸುದೇವನೇ ||೧೩||
ಬುದ್ಧಿ ಶೂನ್ಯನಾಗಿ ಎನ್ನ | ಬದ್ಧಕಾಯ ಕುಹಕ ಮನವ ||
ತಿದ್ದಿ ಹೃದಯ ಶುದ್ಧ ಮಾಡೋ ಪ್ರದ್ಯುಮ್ನನೇ ||೧೪||
ಜನನಿ ಜನಕ ನೀನೆಯೆಂದು | ನೆನೆವೆನಯ್ಯ ದೀನಬಂಧು ||
ಎನಗೆ ಮುಕ್ತಿ ಪಾಲಿಸಿನ್ನು ಅನಿರುದ್ಧನೇ ||೧೫||
ಹರುಷದಿಂದ ನಿನ್ನ ನಾಮ | ಸ್ಮರಿಸುವಂತೆ ಮಾಡು ಕ್ಷೇಮ ||
ಇರಿಸು ಚರಣದಲ್ಲಿ ಪ್ರೇಮ ಪುರುಷೋತ್ತಮ ||೧೬||
ಸಾಧುಸಂಗ ಕೊಟ್ಟು ನಿನ್ನ | ಪಾದಭಜನೆ ಇತ್ತು ಎನ್ನ ||
ಭೇದಮಾಡಿ ನೋಡದಿರೊ ಹೇ ಅಧೋಕ್ಷಜ ||೧೭||
ಚಾರುಚರಣ ತೋರಿ ಎನಗೆ | ಪಾರುಗಾಣಿಸಯ್ಯ ಕೊನೆಗೆ ||
ಭಾರ ಹಾಕಿರುವೆ ನಿನಗೆ ನಾರಸಿಂಹನೇ ||೧೮||
ಸಂಚಿತಾದಿ ಪಾಪಗಳು | ಕಿಂಚಿತಾದ ಪೀಡೆಗಳನು ||
ಮುಂಚಿತಾಗಿ ಕಳೆಯಬೇಕೋ ಸ್ವಾಮಿ ಅಚ್ಯುತ ||೧೯||
ಜ್ಞಾನ ಭಕುತಿ ಕೊಟ್ಟು ನಿನ್ನ | ಧ್ಯಾನದಲ್ಲಿ ಇಟ್ಟು ಸದಾ ||
ಹೀನ ಬುದ್ಧಿ ಬಿಡಿಸೊ ಮುನ್ನ ಶ್ರೀ ಜನಾರ್ಧನ ||೨೦||
ಜಪತಪಾನುಷ್ಠಾನವಿಲ್ಲ | ಕುಪಿತಗಾಮಿಯಾದ ಎನ್ನ ||
ಕೃಪೆಯ ಮಾಡಿ ಕ್ಷಮಿಸಬೇಕು ಹೇ ಉಪೇಂದ್ರನೇ ||೨೧||
ಮೊರೆಯ ಇಡುವೆನಯ್ಯ ನಿನಗೆ | ಶರಧಿಶಯನ ಶುಭಮತಿಯ||
ಇರಿಸೋ ಭಕ್ತರೊಳಗೆ ಪರಮಪುರುಷ ಶ್ರೀಹರೇ ||೨೨||
ಪುಟ್ಟಿಸಲೇಬೇಡ ಇನ್ನು | ಪುಟ್ಟಿಸಿದಕೆ ಪಾಲಿಸಿನ್ನು||
ಇಷ್ಟು ಮಾತ್ರ ಬೇಡಿಕೊಂಬೆ ಶ್ರೀ ಕೃಷ್ಣನೇ ||೨೩||
ಸತ್ಯವಾದ ನಾಮಗಳನು | ನಿತ್ಯದಲ್ಲಿ ಪಠಿಸುವರಿಗೆ ||
ಅರ್ಥಿಯಿಂದ ಸಲಹುತಿರುವ ಕರ್ತೃ ಕೇಶವ ||೨೪||
ಮರೆಯದಲೆ ಹರಿಯ ನಾಮ | ಬರೆದು ಓದಿ ಪೇಳ್ದವರಿಗೆ ||
ಕರೆದು ಮುಕ್ತಿ ಕೊಡುವ ನೆಲೆಯಾದಿಕೇಶವ ||೨೫||

No comments:

Post a Comment