Friday, July 05, 2019

Rraahu and Ketu positive effects ( राहू केतू सकारात्मक दृष्टि कोन)

                                                                                                                                          संग्रहित  
Rraahu and Ketu positive effects  राहू  केतू सकारात्मक दृष्टि कोन
                                                            राहू आणि केतू शिवाय जीवन ही नाही आणि मोक्ष ही नाही    
राहू हा ग्रह मानवात सर्व प्रकारच्या इच्छा निर्माण करतो तर केतु हा ग्रह ती इच्छा पूर्ण करण्यासाठी ऊर्जा देतो या जगात कोणतीही गोष्ट शिकण्यासाठी राहू-केतूचा प्रेरित करत असतात त्यामुळे जिज्ञासा निर्माण करण्याचे  राहू-केतू करतात केतू वर चांगल्या ग्रहांची दृष्टी असेल तर ते चांगल्या गोष्टी शिकण्यासाठी आणि त्यात पारंगत होण्यासाठी प्रवृत्त करतात केतु हा ग्रह  माणसांमध्ये श्रद्धा निर्माण करतोह्या जगात झालेले नादिष्ट कलाकार खेळाडू ज्योतिषी महत्वकांशी लोक हे राहू केतू मुळे
 आहेत
राहू आणि केतू हे डायरेक्ट परमात्मा शी जोडणारे छेदन बिंदू आहेत जगात सर्व अचानक पणे घडणाऱ्या     चांगल्या गोष्टी फक्त राहुमुळे  होतात हा ग्रह शनीचा छाया ग्रह पण म्हणला जातो एखाद्याच्या आयुष्यात झटक्यात बदलते त्याचे जबाबदार राहू-केतूचा आहेत
लॉटरी सट्टा जुगार यांमध्ये फायदा आणि 
तोटा राहु केतू करून देतात जर राहू ग्रह चर राशी(1,4,7,10) मध्ये असेल अचानक धनलाभ, अचानक पणे प्रमोशन ,अचानक पणे सत्ता ,अचानक पणे पाऊस पडणे, इत्यादी सर्व गोष्टी चांगल्या घडवून आणतो मागील जन्मातील सत्कर्मे यांचे फळ राहू आणि केतू हे दोन ग्रह देण्याचे काम करतात त्यामुळे बऱ्याच वेळा राहू-केतू वरून पुनर्जन्म ठरवला जातो सिंह राशि मधील केतू हा माणसाला अध्यात्मिक बनवतो तपस्वी बनवतो त्याच्यामध्ये आत्म दर्शनाची इच्छा जागृत करतो
           नेहमी राहू आणि केतू कोणत्याही ग्रहाची दृष्टी किंवा युतीमध्ये नसताना उत्तम फळे देतात जन्मकुंडलीत राहू केतू कोठेही जरी असले तरी ते माणसाचे मन दर्शवतात त्याची मानसिक अवस्था दर्शवतात माणसाचे सहावी इंद्रिय जागृत करण्याची जबाबदारी राहू आणि केतू कडे असते बऱ्याच वेळा ग्रहण दोष म्हणजे चंद्र राहु किंवा चंद्रकेतू हा मानवास नैराश्य आणतो असे दिसून येते पण त्याच बरोबर हा ग्रहण दोष न म्हणता आयुष्याच्या उतरत्या वयात त्याच माणसास वाचासिद्धी अध्यात्मिक उन्नती देऊन जातो
          निम्म्या आयुष्यात जर राहू-केतू यांनी फसवले असेल तर हेही पण तितकच खर आहे राहू-केतू यांच्यामुळेच आपणास अचानक पणे जमीन कर्जमुक्ती धनलाभ सर्व प्रकारच्या वस्तू हे दोन्ही ग्रह देतो
ज्यांच्या पंचम स्थानात किंवा लाभस्थानात राहू-केतू असतील तर आयुष्यात एकदा तरी फसवणूक होते पण त्याच बरोबर आयुष्यात एकदा तरी लाभ होतोच राहू हा ग्रह माया उत्पन्न करून फसवत असतो तर केतु हा ग्रह अंतर्मुख होऊन माया खोटी आहे हे दर्शवत असतो कोणत्याही गोष्टीची लगेच भुरळ पडत असतील तर ते राहू आणि केतूच धनु मीन सिंह या राशीतील राहू देतो माणसास उच्च दर्जाचे आत्मज्ञान देतात
          केतु हा ग्रह माणसामध्ये लबाडी ओळखण्याची कला निर्माण करतो राहु ग्रह नकारात्मकता पसरवत असेल तर केतु ग्रह सकारात्मकता पसरवतो चतुर्थ स्थानामध्ये राहू अथवा केतू असेल तर राहत्या घरापासून दूरवर भाग्योदय होतो नवम स्थानात राहू अथवा केतू असतील तर त्या व्यक्तीस एकदा तरी परदेशी जाण्याचा योग येतो द्वितीय स्थानात राहू हा मिथुन अथवा कन्या राशीचा असेल तर त्याच्या बोलण्यात एक सिद्धी असते तो अनेक लोकांना बोलण्यातून वश करू शकतो पत्रिकेत गुरु राहू योग माणसाला पैशामध्ये फसवतो
तर गुरू केतू योग माणसाला अध्यात्म कडे वळवतो लग्नस्थानात कुंभ राशीचा राहू माणसाला मागील जन्मातील स्वप्ने दाखवतो याउलट जर तिथे किती असेल तर पुढे घडणाऱ्या गोष्टींचे स्वप्नात संकेत देतो
लग्नस्थानात केतू देवाधर्माचे स्वप्न पडतो तर राहू वाईट स्वप्ने पडतो राहु शुक्र अचानक पणे प्रेमात पडतात पण केतू शुक्र प्रेमात विरह निर्माण करतात राहू आणि केतू ह्या अदृश्य शक्ती आहेत
          तसे माणसात दोन माणस असतात हे का अंतर्मनाने एक बाह्यमन त्यातल्या बाह्यमन म्हणजे राहू आणि केतू म्हणजे अंतर्मन त्यालाच आपण सबकॉन्शस माइंड म्हणतो राहू दशेत केतूचा जप करावा कारण केतू हा राहु मुळे होणाऱ्या फसवणुकीपासून वाचवतो
नियमित अन्नदान करणाऱ्यास राहू फसवत नाही आणि केतू रक्षण करतो राम नामाचा जप मधील रा ह्या अक्षराचे सतत होणारे उच्चारण शरीरामधील सकारात्मकता वाढवते आणि भीती कमी करते
राहू माया उत्पन्न करतो तर केतु दया उत्पन्न करतो हे अंतिम सत्य आहे

No comments:

Post a Comment