. श्रीमद् गोविन्दराज वज्रकवच व होम
अमोघ,दुर्लभ श्रीमद् गोविन्दराज वज्रकवचम् हे स्तोत्र ग्रहबाधा, प्रेतबाधा, करणी बाधा, चेटुक्, दुष्टद्रुष्टि इत्यादि व लक्ष्मी बंधन, ग्रह बंधन अश्या सर्व प्रकारच्या बाधा तोडणासाठी व त्वरित फळ देणारे स्तोत्र आहे
जर तुमच्यावर किंवा एखाद्या सत्शील सन्मार्गी व्यक्तीवर कोणी अन्याय करत असेल तर त्या सन्मार्गी व्यक्तीने या मंत्रा चे खालि सांगितलेल्या पद्धतीने पठण केले असता त्रास देणारा व्यक्ती कायमचा जायबंदी होतो, उलट पक्षि त्या व्यक्तिलाच त्रास सुरु होतो व त्यालाच पश्चाताप वाटतो.
पण जाणून बुजून एखाद्याचे वाईट करण्याच्या हेतूने तुम्ही हे स्तोत्र वाचले तर तुम्हालाही त्याचा त्रास होईल हे लक्षात घ्या.
महत्वाचा नियम : या पाठ कालावधीत अर्वाच्य संभाषण, अखाद्यखाद्य व अखाद्यपेय वर्ज करावा
श्रीगोविन्दराज हे देव उग्र असून दंड देणारे आहेत पण पापी व्यक्तीला , भक्तना तारणहार असून रुद्रदेवा प्रमाणे लवकर फलदायी आहेत अमोघ दुर्लभ श्रीमद् गोविन्दराज वज्रकवच पाठ कसा करावा याचे नियम
शक्यतो पाठ हा शनिवारी किंवा श्री राम नवमि व युगादि प्रतिपदेला सुरु करावा
पाठ कालावधी हा पाच (5) दिवसांचा असून पाठच्या दिवशी श्रीमद् गोविन्दराज प्रतिमा किंवा चित्र पूजून हार फुले वाहून पंचोपचाराने आराधना करून तुमचे इष्टदेव कुलदेव ग्रामदेव याना तुमच्या समस्या सांगून म्हणजे संकल्प करुन त्या पीडा मुक्ती साठी मदतीचे आवाहन करावे आणि प्रत्येक दिवशी एक तांब्याचा हवन कुण्डात गायीच्या गोबराने प्रज्वलित करुन
1) अक्षता (तान्दुळाला हळद कुन्कु व तूप मिश्रण लावलेले) आहुति देत जावा. ( रक्त पितांबर )
2) गायीचे तुपाचे आहुति देणारा व्यक्ती ( स्वतः) (केसरी पितांबर)
3) मन्त्र पाठ करणारा व्यक्ती (श्वेत पितांबर)
4) समिधा म्हणुन पळस,अश्वत्थ,बेल,वट,अंबा मिळाले तर खदिर,आघाडा दुर्वा, अमृतवल्लिचे पाने तुपात बुडवुन आहुति देणे हे सर्वप्रत्येक स्वाहाकार म्हणताना आहुति देणे आहे.हे सर्वाचे पांच बोटा एवढे काष्टे आहुति देणे. ( हिरवा पीतांबर)
असे तीन व्यक्ती ंचे व्यवस्था करावी व व्रतस्थ रहावे
तांब्याचा तांब्या पाण्याने भरून कलश स्थापन करुन ठेवावा त्यात गंध अक्षत फूल टाकून रोज पाच वेळा कवच पाठ करून ते अभिमन्त्रित पाणी घरात सर्वत्र शिंपडून घरातील सर्वानी प्राशन करावे.
या पाच दिवसांच्या कालावधीत घरामध्ये मासिक अडचण आली, सूतक आले तर मनामध्ये पाठ करून मासिक अडचण संपली कि पुढे सुरु ठेवावे पण अडचणीचे दिवस धरू नयेत पण मनात पाठ सुरु ठेवावेत . पाच (5) दिवस झाल्यावर शेवटचा दिवसि गोडधोड जेवण बनवून सुन्ठ,मिरे,गूळ,खोबर्याचे खिस एकत्रित मिश्रण घालून कलि मोदकाचे नेवैद्य दाखवावा व एखाद्या पात्र व्यक्तिला यथाशक्ती मदत करून एखाद्या सुहासिनिस साडीचोळी देऊन ओटी भरून आशीर्वाद घ्यावा .
श्रीमद् गोविन्दराज वज्रकवचम्
अस्य श्री गोविन्दराजवज्र कवच स्तोत्र मन्त्रस्य सीतारामार्य ऋषिः | श्री लक्ष्मी गोविन्दराजो देवता | चन्द्रला शक्ति: | श्रीमद् शेष कीलकं | कालाती क्रम दोष परिहारार्थ जप तप हवने विनियोगः | अथ ध्यानं |
ॐ अभयं गदीनंच शङ्खचक्रं चापंतुणीरं द्रष्टमयं तदैव | तेनैव रूपेण चतुर्भुजेन प्रलयान्तको भव विश्वमूर्ते (स्वाहा:) ||01||
ॐ नमो गोविन्दराजाय सर्व दुष्टनिवारक कालाय विकल्पाय कल्पान्ताय नमो नम: | उग्राय उग्र वीरश्च विकट वज्रश्च देहिमे | नम: सौख्याय दु:खाय सर्वंपीडा हरौ कुरु: स्वाहा: ||02||
ॐ रुद्राय रुद्र घोराय भद्राय भद्रकारिणे गोविदा रूप कपिलाय भीमरथै च दक्षिणे जटाया अमोघाय सत्यं सत्य व्रतं वदा ..ॐ ह्रां ह्रीं ह्रौं ह्रुं ह्रुं ह्रुं ॐ क्ष्रां क्ष्रीं क्ष्रौं स्वाहा: ||03||
ॐ मम नामधेयं अमुक गोत्रस्य अमुक शर्मणः सर्वाङ्ग सह वर्तमानेन अमुक रोगं दारय दारय: दुरितं हन हन: पापं मथ मथ: आरोग्यं कुरु कुरु: स्वाहा: ||04||
ॐ ह्रां ह्रीं ह्रुं ह्रैं ह्रौं ह्रुं ह्रुं मम शत्रुहन हन; द्विष: तद पचयं कुरु कुरु: मम सर्वार्थं साधय स्वाहा: ||05||
ॐ नमो भगवते जगन्निवासाय ॐ क्ष्रौं क्रौं आं ह्रीं क्लीं श्रीं रां यं रं लं वं षं स्त्रां हुं स्वाहा: ||06||
ॐ नमो भिषजाय मम सर्व रोगान् बन्ध बन्ध: सर्व ग्रहान बन्ध बन्ध: सर्व दोषादीनां बन्ध बन्ध: स्वाहा: ||07||
कीटादिनां विषं बन्ध बन्ध: सर्व भूत प्रेत, पिशाच्च डाकिनी शाकिनी, यंत्र मंत्रादीन् बन्ध बन्ध: कीलय कीलय: चूर्णय चूर्णय:, मर्दय मर्दय: ऐं ऐं एहि येये मम विरोधितान् स्वाहा: ||08||
ॐ आं ह्रीं क्षौ क्रौं ह्रुं महोग्र प्रचण्ड वुक्षद्वयाय चक्रेण, शङ्ख गदा वज्रेण भस्मी भूतं कुरु: कुरु: स्वाहा: ||09||
ॐ क्लीं श्रीं ह्रीं ह्रीं क्ष्रीं क्ष्रीं क्ष्रौं लक्ष्मी: चन्द्रलायोः सर्वतो हन हन: दह दह: मथ मथ: पच पच: स्वाहा: ||10||
ॐ नमो भगवते सुदर्शनाय मम विजय रुपे कार्य प्रज्वलाय असाध्यमेनकार्यम् शीघ्रं साधय: सर्व प्रतिबन्धकेभ्यः सर्वतोरक्ष क्षौं रक्षाटमल्ल विमर्दनेतद्दोषं हर प्रचण्ड चक्रेण जहि जहि: स्वाहा: ||11||
भूत-प्रेत पिशाच डाकिनी-शाकिनी उन्मूलनाय ममशरीरं स्तम्भोद्भव समस्त दोषान् हन हन: शर शर: चल चल: कम्पय कम्पय: मथ मथ: स्वाहा: ||12||
ॐ अश्वत्थ निम्बकाविर्भव वृक्षनख वज्रदंष्ट्रश्रीरामकृष्ण वेदव्यासाय ब्रह्मणे परमात्मने भगवते तुभ्य पुरुषाय नमस्तेजस तेजसे: स्वाहा: ||13||
ॐ उग्रं वीर्यं महाविष्णुं ऊर्ध्वमूलमधोक्षजम् सर्वतोत्मान भुइष्टाय भद्रभीषम् नमाम्यहम् सन्नद्धः शरधनुष्य धारिणै ॐ आं ह्रीं क्रौं क्ष्रौं स्वाहा: ||14||
ॐ ब्र्हमाधिदेवाच्युताय अखिल विघ्नान् पच पचः असुर वक्ष विदाराय त्रिभुवन व्यापकाय नमो नमः स्वाहा: ||15||
अगस्त्य नूत गोविन्द रूप अश्वत्थ वृक्षयोः तत्रैव तिष्ट भगवन् रक्ष रक्ष स्त्वमाश्रितान् (स्वाहा:) ||16||
इतिश्री ऋवेद संहिता भाष्याचार्य सीतारामाचार्य विरचित श्रीमद् गोविन्दराज वज्रकवच स्तोत्रम् संपूर्णम्
| श्रीमद् गोविन्दराजार्पणमस्तु |
शंखं चक्रं जलौकां दधिदमृतघटं चारुदोर्भिश्चतुर्मिः।
सूक्ष्मस्वच्छातिहृद्यांशुक परिविलसन्मौलिमंभोजनेत्रम॥
कालाम्भोदोज्ज्वलांगं कटितटविलसच्चारूपीतांबराढ्यम।
वन्दे धन्वंतरिं तं निखिलगदवनप्रौढ़दावाग्निलीलम॥
श्रीमद् गोविन्दराज वज्रकवच स्तोत्र व होम संपन्न करताना घरातील सर्व मण्डळि होम कुण्डास कवचाचा प्रथम व समाप्तिचा मन्त्र पठन करत प्रदक्षिणा (प्रत्येक सदस्य दक्षिणा व होमावशेष आहुति देत प्रदक्षिणा घालावा होमाचा अवशेष तूप समिधा अक्षता एकत्र करुन व सुंठ,काळी मिरी ,काळि तीळ, गूळ मिश्रण एक लिंबु एवढे एकत्र करून खोबर्याचा वाटीत घेऊन व दक्षिणा सहित एका पात्रात घेवुन पूर्णाहुति द्यावा. शेवटि घरातील वैश्वदेव व बलिहरण पूर्ण करावे. पाच दिवस केलेल्या हवन भस्म एकत्रित करुन तूप घालून मिश्रण करुन जपून ठेवावे.रोज किंवा अगत्यतेवेळि धारण करावे. भस्म धारण करण्याचे स्थळ महत्व.
1) शिर, कपाळ, कण्ठ, हृदय, नाभी, कटी, दोन्हीभुजा व पाठिवर होम भस्म धारण करावे.
2) होम भस्म धारण केल्याने कुठल्याहि मन्त्रिक बाधा,शाप,कुदृष्टि,ग्रह बाधा होणार नाही,सकल शत्रु निवारण, अपमृत्यु संभव कमी, ग्रह दोष, गोचर,अगोचर दृश्य अदृश्य रोग परिहार सापडेल, त्या बरोबर सर्व कार्य सुसुत्र चालेल, कामत विजय मिळेल, पति पत्नीचा गृह कलह थांबेल शान्ति मिळेल.
शुभं भवतु
No comments:
Post a Comment