Wednesday, September 04, 2024

SANGALICHA GANAPATI. सांगली चा गणपती

                          सांगली चा गणपती

सांगली चा गणपती आहे सोन्याच्या | 
अंगावरी शेल आहे भरजरीचा ||

सांगली चा गणपती आहे सोन्याच्या |
अंगावरी शेल आहे भरजरीचा. || १||

गणपतीच्या गळ्यावर कापूस हारा |
गणपतीच्या डाविकडे काळा उंदिर  ||२||

गणपतीच्या पूजायाला दूर्वा अघाडा |
लाल फुल वाहताना वास केवडा. ||३||

गणपतीच्या नेवेद्याला मोदक बरा |
गणपतीच्या बेंबिवर झळकतो हिरा ||४||

गणपतीच्या गळ्यावर कापुस लडी. |
गणपतीच्या पाठिमागे नागाची फडी ||५||

गणपतीच्या हातावर पिकल्या अंबा. |
गणपतीच्या चोहू बाजू नाचती रंभा. ||६||

पार्वतीचा मांडिवर गणपती वसे |
पार्वतीला पाहुनीया शंकर हसे. || ७ ||

गणपतीच्या डाव्या कडे आहेत ऋद्धि  |
गणपतीच्या उजव्या कडे आहेत सिद्धि || ८ ||                 

सांगली चा गणपती आहे सोन्याच्या | 
अंगावरी शेल आहे भरजरीचा ||

सांगली चा गणपती आहे सोन्याच्या |
अंगावरी शेल आहे भरजरीचा ||




No comments:

Post a Comment