संग्रहित
पितृपक्ष आणि पितृस्तोत्र
भाद्रपद प्रतिपदा ते अमावास्या पर्यंतच्या पंधरावड्याला पितृपक्ष असे म्हणतात हा कृष्णपक्ष असून यास महालय असे सुध्दा म्हटले जाते हया पंधरावडयात आपल्या पितरांचे वास्तव्य पृथ्वीतलावर असते असे समजले जाते ह्या पितृपक्षात आपल्या पितरांचे आशिर्वाद व त्यांची कृपा प्राप्त होण्यासाठी गरूड पुराणातील पितृस्तोत्र खुप प्रभावी आहे
हे स्तोत्र घरी तुपाचा दिवा लावून माझ्या घरात सुख शांती धन ऐश्वर्य द्यावे अशी आपल्या पुर्वजांना मनापासून कळकळीने प्रार्थना करावी
पितृपक्षात घरातील जेवणाचा एक मुद भात घेऊन त्यावर तुपसाखर घालून नैवेद्य दाखवावा व स्तोत्र म्हणावे नंतर तो नैवेद्य घरातील सर्वांना प्रसाद म्हणून घ्यावा हा नैवेद्य पितरांच्या स्तुतीमुळे पवित्र झाल्यामुळे आपल्या शरीरातील अनेक दोषपीडा यांचे निवारण होते तसेच ज्यांना पितृदोष आहे त्यांनी हे स्तोत्र रोज घरी म्हणावे कमीतकमी अमावस्या व पोर्णिमा हया दिवशी तरी जरूर म्हणावे
पितृ स्तोत्र हे स्त्रीप्राप्ती ,उत्तम पुत्रप्राप्ती , पितरांची तृप्ती ,पितृ दोष नाहीसे होण्याकरता कायम पठण ,श्रवण करावे या पितृ पंधरवड्यात विशेष रोज पठण करावे रुची (स्तोत्र कर्ता ) याला पितरांनी आशिर्वाद दिला आहे जे कोणी या स्तोत्राने आमची स्तुती करतील त्यांना मनोवांच्छित भोग,आत्मज्ञान ,निरोगी शरीर,धन ,पुत्र,पौत्र देऊ ,श्राद्ध प्रसंगी पठण केले तर आम्ही तिथे उपस्थित राहू थोडक्यात पितरांची तृप्ती करणारे हे स्तोत्र आहे याचा जरूर उपयोग करावा
पितृ स्तोत्र
अर्चितानाममूर्तानां पितृणां दीप्ततेजसाम्।
नमस्यामि सदा तेषां ध्यानिनां दिव्यचक्षुषाम्।।
इन्द्रादीनां च नेतारो दक्षमारीचयोस्तथा।
तान् नमस्याम्यहं सर्वान् पितृनप्सूदधावपि।।
नक्षत्राणां ग्रहाणां च वाय्वग्न्योर्नभसस्तथा।
द्यावापृथिव्योश्च तथा नमस्यामि कृतांजलिः।।
देवर्षीणां जनितृंश्च सर्वलोकनमस्कृतान्।
अक्षय्यस्य सदा दातृन् नमस्येऽहं कृतांजलिः।।
प्रजापतं कश्यपाय सोमाय वरूणाय च।
योगेश्वरेभ्यश्च सदा नमस्यामि कृतांजलिः।।
नमो गणेभ्यः सप्तभ्यस्तथा लोकेषु सप्तसु।
स्वयम्भुवे नमस्यामि ब्रह्मणे योगचक्षुषे।।
सोमाधारान् पितृगणान् योगमूर्तिधरांस्तथा।
नमस्यामि तथा सोमं पितरं जगतामहम्।।
अग्निरूपांस्तथैवान्यान् नमस्यामि पितृनहम्।
अग्निषोममयं विश्वं यत एतदशेषतः।।
ये तु तेजसि ये चैते सोमसूर्याग्निमूर्तयः।
जगत्स्वरूपिणश्चैव तथा ब्रह्मस्वरूपिणः।।
तेभ्योऽखिलेभ्यो योगिभ्यः पितृभ्यो यतमानसः।
नमो नमो नमस्ते मे प्रसीदन्तु स्वधाभुजः I
स्तोत्र वाचन झाल्या नंतर पितरदेवताभ्यो नमः
असे पाच वेळा म्हणून जमीनीवर डोके टेकवून नमस्कार करावा पितरांची दक्षिण दिशा समजली जात असल्यामुळे स्तोत्र पठण दक्षिणेला आपले मुख करून कराव्याचे आहे
शुभं भवतु
No comments:
Post a Comment