संग्रहित
पितृपक्ष व वैज्ञानिक दृष्टिकोन
वैदिक सनातन धर्म जीवन पर्यंत तर थोर मोठ्यांची सेवा करण्याची शिक्षा देतेच त्या बरोबर मृत्यू पश्चात देखील पितरां च्या तृप्ती साठी श्राद्ध आणि तर्पण या वर भर देते.
जसे कि नावानेच स्पष्ट होते कि ,श्रद्धा पूर्वक पितरां च्या तृप्ती निमित्त केलेल्या कार्यास श्राद्ध म्हणतो .
श्राद्ध कर्म एक आवश्यक संस्कार आहे आणि शास्त्र संमत सुद्धा आहे.मनुष्य कधीच माता पिता यांच्या ऋणातून मुक्त नाही होत,त्यासाठीच जीवन पर्यन्त त्यांची सेवा केल्या नंतर हि मृत्यू उपरांत हि संस्कार सांगितले आहे.
शास्त्रा नुसार देव ऋण ,ऋषी ऋण,पितृ ऋण श्राद्ध कर्मा नुसारच उतरू शकते.विष्णू पुराण देखील त्याची ग्वाही देते कि,श्राद्ध ने तृप्त होऊन पितृ गण समस्त कामनांची पूर्ती करून श्राद्ध करणाऱ्या व्यक्ती वर विश्वेदेवगण,पितृगण ,मातामह तथा कुटुंबीजन सर्व संतुष्ट असतात.खास करून भाद्रपद कृष्ण पक्ष(पितृ पक्ष)मध्ये श्राद्ध केल्याने पितृ गण स्वयं येऊन ते ग्रहण करून प्रसन्न होतात.पिंड भाग न मिळाल्याने निराश होऊन शाप देऊन जातात असे हि शास्त्र वाचन आहे.
तर आपल्या प्रश्न पडतो कि श्रद्धातिल अन्नभाग पितरं पर्यन्त कसा प्राप्त होतो?त्याचे सरळ उत्तर ज्याप्रमाणे विशिष्ट ठिकाणी राहणारा व्यक्तीस आपण पत्र किंवा संदेश त्याच्या नावाने लिहून पाठवितो आणि त्याला ते मिळते तसे च काहीशी क्रिया येथे घडते.ज्या ज्या नावाचे उच्चरण करून वैदिक मंत्रोउच्चराने पिंड दान केल्या जाते तर त्यांना ते प्राप्त होते.
श्राद्ध कर्मात आपल्या द्वारा अर्पित पदार्थ चे सुष्म अंश सूर्य रश्मी च्या द्वारे सूर्य लोकात पोहचते आणि तेथून अभीष्ट पितरं यांना ते प्राप्त होते.शास्त्रात हि पण मान्यता आहे कि,पितृ पक्षात ब्राम्हण भोज दरम्यान सुष्म रुपात त्यांना च मिळत असते.
वर्तमान काळात स्वतः ला तथाकथित आधुनिक म्हणणारे,विज्ञानवादी म्हणविणारे लोक श्राद्ध ,तर्पण ई.ला ढोंग आहे असे सांगतात हे त्यांची संकीर्ण मानसिकता चे प्रदर्शन आहे.असे लोक आपल्या जीवनकाळात आई -वडिलांना सुख देऊ शकले नाहीत तर मृत्यू उपरांत त्याच्या पुढे श्राद्ध ची गोष्ट करणे म्हणजे अंध व्यक्तीस दिवा दाखविण्या सारखेच आहे.असे लोकं श्राद्ध तर्पण याला अपव्यय ,अनावश्यक खर्च समजतात.हि खूप चुकीची समज आहे.कारण व्यावहारिक दृष्टीने त्या पेक्षा किती तरी अधिक पुण्य कर्म आपल्याला च वापस मिळते.
आपला सनातन धर्म पूर्ण सहिष्णू तथा विष्वहितकारी आहे. इतका उदार इतर अन्य कुठला हि धर्म नाही ,त्याची विशेषतः हीच आहे कि निर्सग ,प्रकृती,देवी देवता ला महत्व आहेच त्या बरोबर एक संपूर्ण पक्ष पूज्य पितरांना समर्पित आहे. जीवित व्यक्ती ची तर सेवा करावी च आणि नंतर हि श्रद्धा ठेवावी.जो जीवन्तपनी हि सेवा करतो तोच खरा श्रद्ध कर्माचा पूर्ण अधिकारी आणि पुण्य प्राप्त करणारा असतो.पण काही वेळा मेल्या नंतर काही ना प्रायश्चित करावेसे वाटते तेव्हा हि क्रिया करता येते.'श्राद्ध ' शब्द तर पारिभाषिक आहे त्यात श्रध्दा हा मधुर भाव निहित आणि अपेक्षित आहे.
ज्या आई वडील यांच्या मुळे आपल्याला शरीर प्राप्त झाले ,आपले संगोपन केले त्यांच्या नावाने आपन काही क्रिया ना करू तर हा आपला कृतघन पना होईल. त्यांच्या नावाने त्यांच्या शांती साठी ,आत्मतृप्ती साठी दान धर्म तर योग्य आहे पण त्या बरोबर श्राद्धानुष्ट्ण यथावत केल्याने प्रेतयोनी प्राप्त झालेले यांचे प्रेतत्व दूर होत असते.
पिंड दानातून निःचित कष्टमुक्ती होत असते ,जसे हजारो कोस वरील शब्द रेडिओ द्वारा तत्क्षण सर्वत्र ऐकू येतो.तसेच मनः संकल्प द्वारा एवम श्रद्धा पूर्वक (फक्त कृती म्हणून नाही)केलेल्या श्राद्ध आदि क्रिया मूळे चंद्र लोक स्थित पितर यांना प्राप्त होऊन ते प्रसन्न होतात. या पितृ पक्षत जरूर मृत्यू तिथीस किव्वा अमावसयेस श्राद्ध करावे. चंद्रमा मनसो जात: चंद्रमा मनाचा आदीष्टता आहे.आपल्या मनाने संकल्पित क्रिया हि सुष्मता ते ने पितरं यांच्या पर्यन्त नक्कीच पोहचते.
श्राद्ध पूर्णतः रहस्यपूर्ण आनि विज्ञानपूर्ण आहे.ते कसा याचा विचार करूया,
श्राद्ध पक्षात अन्य महिन्या पेक्षा चंद्रमा पृथ्वी च्या जवळ असतो.या मुळे त्याच्या आकर्षण शक्ती चा प्रभाव पृथ्वी तथा त्यात अधिष्टीत प्राणी वर विशेष रुपात पडत असतो.तेव्हा जितके सुष्म शरीर युक्त जीव चंद्र लोक च्या वरील भागात स्थित पितृ लोकात जाण्या साठी प्रयत्नशील असतात ,जातात असतात त्याचा संकल्प करून प्रदत्त पिंडातिल अंश त्यांना मिळून आपल्या मनातील संकल्प शक्ती आणि वैदिक क्रियेतून उत्पन्न विशिष्ट शक्ती यांनी अतृप्त पितरं याना पितृ लोक प्राप्त होते.मग त्यांना केलेली हि मदत आशीर्वाद रुपात पुन्हा आपल्याला मिळते.
विज्ञान विज्ञान म्हणणारे ऊर्जा अक्षयतेचा नियम का विसरतात, कि ऊर्जा हि नष्ट केल्या जात नाही आणि निर्माण हि फक्त ती एका रुपातून दुसऱया रुपात रूपांतरित होते. गीता हि वेगळी काय सांगते ' नैनम छिन्दन्ति शस्त्रांणि नैनम दहति पावकः ...... विज्ञान तिला ऊर्जा म्हणते आमचे ऋषी मुनी तिला आत्मा म्हणतात. विज्ञान सांगते कि कुठलीही कृती करताना तुम्हला विशिष्ट शक्ती ची,उर्जे ची ,त्या विद्युत ची गरज असते.
जसे शरीर चालविण्या साठी व्हिटामिन,ग्लुकोज, हे सर्व आपण फळ,अन्न यातून प्राप्त करतो .म्हणजे ती हि एक प्रकारची विद्युत झाली.शरीरातील साखर कमी झाली कि संतुलन बिघडते,फळ खाल्ले, नारळ पाणी पिले कि आपण ठीक होतो म्हणजेच ती विद्युत शक्ती अन्नात हि आहे. हे मान्य करावे लागेल. तांदूळ,जव यात थंड विद्युत आणि तिल यामध्ये उष्ण विद्यत आहे.आपण जे काही बोलतो त्यातून हि विद्युत उत्पन्न होतेच कि हे सर्व विज्ञान यांनीच सिद्ध केले आहे.
जेव्हा कोणी ब्राम्हण वृंद वेदमंत्र उच्चार करत असतील तेव्हा बघा त्या ती विद्युत जाणवत असते. थंड त्यांचे शरीर यातून घाम ची धार सुरु होते. का कारण वेद मंत्रातिल ध्वनी हि विद्युत निर्माण करते. श्राद्ध क्रिये च्या वेळी कुश (दर्भ) जमिनी वर अंथरले जातात कि ती विद्युत शक्ती पृथ्वीत समाहित होऊ नये.
जेव्हा पितृगण संबंधित वेदमंत्र विद्वान ब्राम्हण म्हणतात ( ब्राह्मण मुखातून निघणारा वेदमन्त्र स्वरयुक्त व शब्द निरातङ्क बाहेर पडणे आवश्यक आहे असे नियम ) तेव्हा नाभी चक्रात समूस्थित वायू कर्म करणाऱ्या शरीरातून उष्ण विद्युत उत्पन्न करून शरीरा बाहेर निघून ती ऊर्जा वेदमंत्रो उच्चारण तुन निर्माण झालेली ऊर्जा यातून पिंड द्वारे ते पितरं यांच्या पर्यन्त पोहचते.हा संशोधनपर विषय आहे,विज्ञान दृष्टिकोन ठेवून संशोधन करणे गरजेचे आहे.उगाच टिप्पणी करून दुर्लक्ष करू नये.
काहीं च्या मानत शँका येते मृत्यू पश्चात मृतक अन्न भाग,तर्पण जल कसा ग्रहण करणार?
श्रद्ध भाग जरी जीवित स्थूल पुरुष ग्रहण करू शकत नसेल तरी मृतक जीव हा सुष्म पितृ शरीर असून आकाश तत्व ,वायू तत्व यांनी तो ग्रहन करतो.
ज्या प्रमाणे आपल्या कडे दूरसंचार यंत्र मुळे युरोप,इंग्लड येथील शब्द ऐकू शकतो कारण ते यंत्र आज उपलब्ध आहे ,तसेच अतृप्त पितृगण,पितृ लोकांतील पितरं याना ती शक्ती सहज प्राप्त झालेली असते.
स्थूल शरीर नष्ट झाल्यावर देव-पितृ याना ती शक्ती प्राप्त होत असते,होम अग्नी द्वारा सुष्म अंश आकाशातून सूर्य सहित इतर देव घेतात तसेच श्राध्द कर्मतून तो अंश पितरं घेतात.
टैलीपैती हे विज्ञान नाहीतर काय आहे? हि श्राद्धीय शक्ती ऋषी नीं हजारो वर्ष केलेल्या तप,आणि योग साधनेच्या बळावर प्राप्त केले आहे,त्याला कोणताही शास्त्रज्ञ विद्वान खंडन करू शकत नाही.
आपल्या द्वारा केलेल्या श्राद्ध अन्न यास वसू,रुद्र,आदित्य, हे आकृष्ट करून स्थूल पितरं,जे नीच योनीत आहेत त्यांना प्रदान करतात.हे विज्ञान नाही तर काय आहे.आम्ही वसू,रुद्र,म्हणत असू विज्ञान त्याला दुसरे नाव यांनी ओळखत असेल. हा हे मान्य करतो कि,व्यापारी करण,किव्वा इतर बाब हे चुकीचे आहे.पण त्या मुळे मूळ शास्त्र दुर्लक्षित करू नये. सश्रद्ध होऊन कृती करावी.गो शाळेला दान,वृद्धाश्रमाला दान, भुकेलेला भोजन हे सर्व करावेच त्यासोबत श्राद्ध विधी हि तितकीच महत्व पूर्ण आहे. श्रद्ध तिल वस्तू ,अन्न पितरं यांना कशी प्राप्त होते?
शास्त्र सांगते कि,संकल्पप्रोक्त नाव,गोत्र,च्या आधारावर विश्वदेव,हव्य ,कव्य पितरं यांच्या पर्यन्त पोहचवितात. जर आई -वडील पिर्तु गण देव योनीत असेल तर हव्य ,कव्य अमृतरुपात त्यांना प्रदान केले जाते. पाशु पक्षी योनीत असेल तर तृन,धन्य त्यांना मिळते. नागादि योनीत वायू रुपात,यक्ष योनीत पानरुपात मनुष्य देह प्राप्त असेल तर अन्न रुपात मिळते. नाम गोत्र ह्रदयातील भक्ती श्रद्धा,आणि शुद्ध उच्चरीत हव्य,कव्य संदेश सहित विश्वदेव पितरांना पोहचवितात.
यथा गोष्टे प्रनष्टाम वै वत्सो विन्दन्ती मातरम।
तथा तं नयते मंत्रो जन्तुरयत्रा वंतिष्ठ ते।।
नाम गोत्रम च मंत्रश्च दत्तमन्न नयंती तम।
अपि योनी शतम प्राप्त संतृप्ती स्तननुगछत्ति।।
म्हणजेच हजारो गाई न मध्ये वासरू बरोबर आपल्या आई पर्यंत पोहचते तसेच नाम ,गोत्र,आणि श्रद्दे ने उच्चरीत मंत्र पितरं यांच्या पर्यन्त अन्न भाग पोहचवीत असतात. आपण म्हणतो कि भुकेलेला अन्नद्या, गाई ला चारा द्या, वृद्धश्रमात मदत करा पण एक विचार केला आहे का, कदाचित त्यांच्या रुपात कुणाचे तरी पितरं असतील त्याच्या नावाने केलेल्या श्राद्द कर्मा मुळेच तुम्ही त्यांच्या पर्यन्त पोहचत असाल.नाही तर हजरो लोक भुकेले आहेत,गाई असो ,वृद्ध व्यक्ती असो आपण टरावीक ठिकाणी च का पोहचतो? हे सर्व करा पण सोबत श्रद्धयुक्त अंतकरणाने श्राद्ध विधी सुयोग्य व्यक्ती कडून करावी.आपण केलेले श्राद्ध किंवा अन्नदान यामुळे इतर योनीत असलेल्या आपल्या पितरं यांना कुणी अन्नदान करेल. म्हणून विज्ञान मान्य करावे च अंधश्रद्धा नसावी च पण श्राद्धा ठेवून जरूर हि विधी करावी.
आयु: प्रजा धनं विद्या स्वर्ग मोक्षम सुखानी च।
प्रयच्चंती तथा राज्यं प्रीता नृना पितामह।।
श्राद्ध करणारा आयु,धन,राज्य ,ज्ञान,स्वर्ग,मोक्ष सर्व त्यास प्राप्त होते.फक्त भाव ठेवून करावे कोणतीही कृती वाया जात नाही. विवेक बुद्धी ठेवून कृतज्ञतेने करावे.
|| पितृ देवार्पणमस्तु ||
No comments:
Post a Comment