Thursday, July 25, 2019

DECISION of BLAMELESS MANGALA (मंगळ निर्दोष निर्णय)

DECISION of BLAMELESS MANGALA (मंगळ निर्दोष निर्णय)मंगळ निर्दोष निर्णय) 
मंगळ (कुज) दोषाची पत्रिका म्हणजे काय ?
जन्म लग्न कुंडलीत  १,४,७,८,१२ या भावात मंगळ असेल तर मंगळ दोषाची पत्रिका होते 
पण या भावातील मंगळ कोणते दोष उत्पन्न करतो त्याबद्दल विचार करू 
लग्न भाव :-  लग्न भावातील मंगळ आरोग्याच्या 
दृष्टीने घातकी असतो . उष्णतेचे विकार जडतात . 
तामसी  ,हट्टी  ,दुराग्रही व रागीट स्वभावाचा असतो आप्तस्वकियांमध्ये कलह निर्माण करतो . ३,७,११  या राशींचा मंगळ भाग्य हीन करतो . लग्नातील 
मंगळ संसार सुखाच्या दृष्टीनेही अपयश देतो . ४,८,१२ या राशींमधील मंगळ मृत्यूतूल्य पीडा देतो 

चतुर्थ भाव :- चतुर्थातील मंगळ मातृसुख मिळू देत नाही . स्वतःची वास्तू होते मात्र सुख मिळत नाही . ऐन सुखाच्या वेळी पती किंवा पत्नी  यापैकी एकाचा मृत्यू संभवतो . स्त्रीसुख मिळत नाही . वाहनापासून अपघाताचे योग्य असतात . 

सप्तम भाव :- वैवाहिक सुखाच्या दृष्टीने घातक योग्य असतो . वियोग संभावतो . वैधव्य योगही होतो. जोडीदाराला ताब्यात ठेवण्याचा प्रयत्न करतात सतत भांडणाची परिस्थिती निर्माण होते . हुकूमत गाजवण्याची वृत्ती असते . स्त्रीच्या कुंडलीत गर्भाशयावर परिणाम होण्याची शक्यता असते 


अष्टम भाव :-अष्टमातील मंगळ अपघातासारखे प्रसंग आणतो . अपघातामध्ये मृत्यू होण्याचे योगही असतात जळून ,भाजून ,कापून मृत्यू होतो चर्चा होण्यासारखी भयंकर घटना आयुष्यात घडते . जननेंद्रियावर  अशुभ परिणाम होतो . वैवाहिक आयुष्याचा नाश करतो 

द्वादशा  (व्यय) भाव :- व्यय भावातील मंगळ अनेक प्रकारचे आजार देतो . आजारापायी बऱ्याच वेळा हॉस्पिटल मध्ये भरती होण्याची पाळी येते . सांपत्तिक स्थितीही  घसरत जाते . लोकांच्या कट कारस्थानाचे बळी पडतात . विवाहानंतर १-२ वर्षातच सासरकडील कुटुंबात कोणाचा तरी मृत्यू होण्याची शक्यता असते .येथील 

मंगळ बंधन योगासारखे प्रसंगही आणतो . 
या भावातील  मंगळाची दृष्टीही अशुभच असते . मंगळ ज्या भावात आहे तेथील अशुभ फळे देतोच पण तो जिथे दृष्टी ठेवतो तिथेही अशुभ फळे देतो 

१) प्रथम स्थानात मंगल असता तो  ४,७,८ या भावांवर दृष्टी ठेवतो . 
२) चतुर्थ भावात मंगळ असता तो  ७,१०,११  या भावांवर दृष्टी ठेवतो . 
३) सप्तम भावातील मंगळ १० , १ ,२  या भावांवर दृष्टी ठेवतो . 
४) अष्टमातील मंगळ  ११ ,२ ,३ या भावांवर दृष्टी ठेवतो . 
५) व्यय भावातील मंगळ ३ ,६ ,७ या भावांवर दृष्टी ठेवतो . 
तीव्र मंगळ ( १,४,७,८,१२ या भावातील )
स्वराशीचा या मंगळ म्हणजे मेष व वृश्चिक राशीचा मंगळ 
उच्च राशीतील म्हणजे मकर राशीतील मंगळ 
मित्र राशीतील मंगळ म्हणजे रवी  ,गुरु ,चंद्र या ग्रहांच्या राशीतील मंगळ 
अग्नी राशीचा मंगळ सौम्य मंगळ 
निच राशीतील मंगळ म्हणजेच कर्क राशीतील मंगळ अस्त किंवा वक्री मंगळ  शत्रू राशीतील मंगळ 
जलराशीतील मंगळ बलवान  ,उच  ,स्वराशीचा गुरु शुक्र अथवा चंद्र यांनी दृष्ट मंगळ 
कर्क आणि सिंह लग्नाच्या कुंडलीत मंगळ केंद्र त्रिकोणाचा अधिपती होतो म्हणून तो राजयोग कारक होतो म्हणून तो सौम्य मंगळ होतो  चंद्र मंगल युती असेल तर मंगळ लक्ष्मी योगाचा कारक बनतो 
मंगळ ज्या राशीत असेल त्या राशीचा स्वामी केंद्र किंवा त्रिकोणात असेल तर मंगळदोष होत नाही . 
मंगळाच्या पत्रिकेत चंद्र केंद्र स्थानात असेल तर मंगळ दोष सौम्य होतो  मंगळाबरोबर राहू असेल तर मंगळ दोष जातो 

वधूवरांच्या पत्रिकेत मंगळदोष प्रामुख्याने पाहावा लागतो 
एकाच्या पत्रिकेत मंगळदोष असेल आणि दुसऱ्याच्या पत्रिकेत दोष नसेल तर दोष निवारणार्थ खालील स्थिती आहे का पाहणे 

१) वधु  किंवा वराच्या पत्रिकेत ज्या भावात मंगळ आहे त्याच भावात शनी असेल तर .... 
२) वधु  किंवा वराच्या पत्रिकेत जरी  मंगळ असला तरी जोडीदाराच्या पत्रिकेत सूर्य  ,राहू किंवा केतू यापैकी एकही ग्रह १,२,४,७,८,१२, या भावात असेल तर .... 
३) वधु किंवा वराच्या कुंडलीत मंगळ असून सूर्य ३,६,१०,११ या भावात असेल आणि गुरु शुक्र हे उच्च राशीत असतील तर ...... 
४) चंद्र हा २,५,९,११ या भावात असेल तर मंगल दोषाचे निवारण होते 
अशा प्रकारे मंगळ दोषाचा विचार करावा लागतो . मंगळदोषाबद्दल सध्या बराच गैरसमजही आहे त्याच साठी थोडी माहिती मी दिली आहे जन्म पत्रिका लिहिणाऱ्यानी लग्न कुंडली मंगळ दोषाचा असेल  निर्दोष होत असेल तर  निर्दोष निर्णय अवश्य लिहावे, पाहणाऱ्यानी वरीला सर्व गोष्टी चा विचारा जरुर करावा                                                                                   !!  श्रीकृष्णार्पणमस्तु !!

*The related post available in this blog / site please click : 

No comments:

Post a Comment