Wednesday, April 28, 2021

VERSATILE Rama Rakshaa Stotram ( अष्टपैलु रामरक्षा स्तोत्रं )

अष्टपैलु  रामरक्षा स्तोत्रं  

रामरक्षेची कथा अशी सांगितली जाते की, "एकदा माता उमादेवीने रुद्रदेवास विचारले जसे विष्णुसहस्त्र नामावली आहे तसेच रामाचे एखादे स्तोत्र नाही का ? "तेव्हा भगवान शंकरांनी माता पार्वतीस या 'रामरक्षा' स्तोत्रविषयी सांगितले. पण मुळात रामरक्षेची निर्मिती कशी झाली त्याला एक कथा आहे. 

आद्यकवी वाल्मिकींनी रामायणाची निर्मिती केली. १०० कोटी श्लोक असलेले हे रामायण सर्वांनाच मिळवावेसे वाटू लागले. देव, मानव आणि दानव भगवान शंकरांकडे ते प्राप्त करण्यासाठी गेले. ते कुणाला मिळावे यासाठी त्याच्यामध्ये खूप वाद झाले. शेवटी श्ंकरांनी रामायणाची सर्वांमध्ये समान वाटणी करण्याचे ठरवले. १०० ही सम संख्या असल्याने कितीही वाटणी केली तरी एक श्लोक राहिलाच. हा अनुष्टुप छंदातील असल्याने एका श्लोकात ३२ अक्षरे होते. त्याचीही वाटणी केली. शेवटी दोन अक्षरे शंकरांनी स्वत:कडे ठेवली. ते म्हणाले," ही दोन अक्षरे मी माझ्याकडेच ठेवतो " असे सांगून त्यांनी सर्वांना जाण्यास संगितले व ध्यानासाठी बसले. पण देव, दानव, मानव यांचे मन काही भरेना. शंकरांनी ती अक्षरे स्वत:जवळ ठेवून घेतली याचाच अर्थ त्यात काहीतरी महत्वाचे असणार म्हणून सर्व जण वाट पाहू लागले. काही काळाने कंटाळून एकामागे एक सगळे जावू लागले. एक ऋषि मात्र शेवटपर्यंत थांबले.त्यांना काहीतरी अजून मिळावे याची प्रचंड इच्छा होती. त्यांनी बराच वेळ वाट पाहिल्यानंतर त्यांना डुलका लागला आणि नेमके त्याचवेळी शंकर ध्यानातून बाहेर आले. त्यांनी त्या ऋषींकडे बघितले. त्यांना त्यांचे कौतुक वाटले. मग त्यांनी एक आशीर्वाद म्हणून त्या ऋषींच्या स्वप्नात जावून 'रामरक्षा' सांगितली. काही काळाने ऋषींना जाग आली. आणि जे स्वप्नात सांगितले आहे त्यावरून त्यांनी सुरेख अशा 'रामरक्षेची ' निर्मिती केली. त्या ऋषींचे नाव होते 'बुधकौशिक' ऋषी. याचे वर्णन रामरक्षेच्या पंधराव्या श्लोकात केलेले आहे __

आदिष्टवान्यथा स्वप्ने रामरक्षामिमां हरः || तथा लिखितवान्प्रात:प्रबुद्धो बुधकौशिकः || 

शतकोटीचे बीज वाचे उच्चारी ----------शतकोटीचे बीज म्हणजे राम हि ती दोन अक्षरे.

श्रीरामरक्षा’ ह्या स्तोत्राचे महत्व काय?

श्रीरामरक्षा या शब्दाचा अर्थ रक्षणकर्ता राम असा आहे. प्रभु रामचंद्रांना ‘मर्यादा पुरुषोत्तम‘ असे म्हणतात. प्रभु रामचंद्रांचे चरित्र अवलोकन केल्यास आपल्या असे लक्षात येईल की, प्रभु रामचंद्रांनी राजा, पिता, बंधू, पति या सर्व नात्यांनी मर्यादा सांभाळून एक फार मोठा आदर्श घालून दिला आहे. बुधकौशिक ऋषिंच्या स्वप्नात जाऊन प्रत्यक्ष प्रभु रामचंद्रांनीच रामरक्षा हे स्तोत्र सांगितले आहे. त्यामुळे रामरक्षा स्तोत्रातील प्रत्येक अक्षर हे मंत्रमय व तारक असे आहे. हातपाय धुवून, शुचिर्भूत होऊन रामरक्षा म्हणण्यास हरकत नाही. कुमार वयातील मुलांनी तर रामरक्षा नित्याने अवश्य म्हणावी. त्यामुळे वाणीवर पण योग्य संस्कार होतात व नित्य रामरक्षा पठणाने शक्ति उत्पन्न होते व ती आपले सदा सर्वकाळ रक्षण करते. आबालवृद्धांनी पण नित्य रामरक्षा म्हणावी. त्याच्यापासून निश्चित फायदा आहेच. रामरक्षेचे अनुपालन करण्याची पण पद्धत आहे. कोणत्याही महिन्याच्या शुद्ध प्रतिपदे पासून सुरुवात करून शुद्ध नवमीपर्यंत हे अनुष्ठान करतात. प्रतिपदेला एकदा, द्वितीयेला दोनदा याप्रमाणे चढत्या क्रमाने वाचून नवमीच्या दिवशी नऊवेळा रामरक्षेचा पाठ म्हणावा. अनुष्ठान म्हटले की त्याच्या यमनियमांचे पालन करणे झालेच. याचा अनुभव आल्याशिवाय राहात नाही.

रामरक्षा हे स्तोत्र अत्यंत प्रभावी असे आहे.

आपण कधी विचार केला आहे का , की आपण "राम-राम" दोन वेळेस का म्हणतो.कारण

 र = २७ वा शब्द. ( क ख ग घ ड..........)

 आ = २ रा शब्द. (अ आ..)

 म = २५ वा शब्द शब्द.(अ आ............)

एकूण = ५४. 

 राम + राम.

 ५४+५४ = १०८.

आपण जी गळ्यात माळ घालता तिचे मणि सुद्धा १०८ असतात. ह्याचा अर्थ = आपण एका व्यक्तीला जर दोनदा  "राम-राम" म्हटले तर आपण एक माळ जप केला असा होतो..... 

रामनाम घेत असतांना लक्ष नामावर स्थिर झाले की मन लक्ष+मन= "लक्ष्मण" होते

नामस्मरण  करताकरता मन उन्मन होते म्हणजेच "हनुमान" होते.

हनुमान झालेले हे मन भक्तीमध्ये रत झाले की "भरत" होते.

असे मन सततच्या नामस्मरणामुळे तृप्त होते, त्यातील विकार नाहीसे होतात ,शत्रुंचे हे मन हनन करते म्हणून ते " शत्रुघ्न " होते.

अशा नामस्मरणाने मन शांत होते शीतलता प्राप्त  करते म्हणजेच  " सीता " होते.

सीता झालेल्या या मनात दुसरा कोणाचा विचार येऊ न शकल्याने ते " राम " स्वरूप होते. 

रामरक्षेच्या एका श्लोकाबद्दल- कदाचित माहिती असेलही सगळ्यांना....

रामो राजमणिः सदा विजयते रामं रामेशं भजे । रामेणाभिहत निशाचरचमू रामाय तस्मै नमः । 

रामान्नास्ति परायणं परतरं रामस्य दासो$सम्यहम् । रामे चित्तलयः सदा भवतु मे भो राम मामुद्धर ।।

या श्लोकात राम या नामाच्या सगळ्या विभक्ती आल्या आहेत. रामो=रामः(प्रथमा) रामं(द्वितीया), रामेण(तृतीया), रामाय(चतुर्थी), रामान्नास्ति=रामात् (पंचमी) रामस्य(षष्ठी), रामे(सप्तमी), भो राम(संबोधन).

ह्या श्लोकात रकाराची पुनरावृत्ती असल्याने गर्भारपणात हा श्लोक म्हणल्याने जन्माला येणारे बाळ बोबडे (किंवा जीभ जड असलेले) होत नाही.

रामरक्षा: आरोग्यरक्षक कवच

एक वेगळा पैलू तुमच्यासमोर मांडत आहे. श्रीरामरक्षा स्तोत्र हे आजही कित्येक घरांमध्ये तिन्हीसांजेला आवर्जून म्हटले जाते. 

आजारी व्यक्ती वा शस्त्रक्रिया झाल्यानंतर त्या रुग्णाला रामरक्षा ऐकवली जाते. रामरक्षाच का? असे काय रहस्य या मंत्रात दडले आहे?

रामनामकवच:

शिरो मे राघवः पातु भालं दशरथात्मजः ॥४॥ कौसल्येयो दृशौ पातु विश्वामित्रप्रियः श्रुती ।

घ्राणं पातु मखत्राता मुखं सौमित्रिवत्सलः ॥५॥ जिह्वां विद्यानिधिः पातु कण्ठं भरतवंदितः ।

स्कंधौ दिव्यायुधः पातुभुजौ भग्नेशकार्मुकः ॥६॥ करौ सीतापतिः पातु हृदयं जामदग्न्यजित्‌ ।

मध्यं पातु खरध्वंसी नाभिं जाम्बवदाश्रयः ॥७॥ सुग्रीवेशः कटी पातु सक्थिनी हनुमत्प्रभुः ।

उरू रघूत्तमः पातु रक्षःकुलविनाशकृत्‌ ॥८॥ जानुनी सेतुकृत्पातु जंघे दशमुखान्तकः ।

पादौ विभीषणश्रीदः पातु रामोऽखिलं वपुः ॥९॥

असे कवच या स्तोत्रात आलेले आहे. कवच म्हणजे आपल्या प्रत्येक अवयवाचे रक्षण करण्यासाठी मंत्र धारण करणे, थोडक्यात; आपले संपूर्ण शरीरच रामनामाने अभिमंत्रित करणे. या कवचाची फलश्रुती नीट पहा....

पातालभूतलव्योम चारिणश्छद्मचारिणः । न द्रष्टुमपि शक्तास्ते रक्षितं रामनामभिः ॥ ११ ॥

म्हणजे, पाताळ, भूमी आणि आकाश या तिन्ही लोकांत संचार करणारे, छद्मचारिणः म्हणजे खोटे सोंग घेणारे असे (राक्षस) रामनामाने रक्षिलेल्या लोकांकडे नजर वर उचलून पण पाहू शकत नाहीत

.'छद्मचारिणः' हा शब्द पुन्हा वाचा. काही आठवलं? विज्ञान शिकत असताना 'pseudo podium' हा शब्द आपण शिकलेला असतो. अमिबासारखे जीव हे pseudo podium म्हणजे छद्मपाद म्हणून ओळखले जातात! थोडक्यात; इथे 'राक्षस' हे अक्राळ विक्राळ  शिंगं वगैरे असलेले राक्षस नसून सूक्ष्मजीव आहेत. आयुर्वेदात विशेषतः सुश्रुत संहितेत कृमी, राक्षस असे शब्द अनेक ठिकाणी सूक्ष्मजीवांसाठी वापरण्यात आलेले आहेत.

रामरक्षा सिद्ध कशी करावी ?

१२१ रोज एकदा ठराविक ठिकाणी  ठरावीक वेळी म्हटल्याने रामरक्षा सिद्ध होते किंवा गुढीपाडवा ते रामनवमी ह्या काळात दररोज १३ वेळा...किंवा अश्विन प्रतिपदा ते नवमी म्हणजे शारदीय नवरात्रात दररोज १३ वेळा पठण केल्याने रामरक्षा सिद्ध होते.

इतर फायदे: 

संपूर्ण रामरक्षेचे १५००० पाठ केल्याने रामरक्षा सिद्ध होते.

प्रत्येक अवयवाचे स्वतन्त्र पाठ केल्याने त्याचे स्वतंत्र फलित मिळते.

उदा:

आपदामपहर्तारम.....हा श्लोक 1 लक्ष वेळा म्हणल्याचे ऋणमुक्ती हे फळ आहे.

कौसल्याये दृशो पातु:.... हा श्लोक सतत म्हटल्याने...डोळ्यांचे विकार बरे होतात...

जय श्रीराम

श्रीराम रक्षास्तोत्रम

ॐ अस्य श्री रामरक्षा स्तोत्रमन्त्रस्य बुधकौशिक ऋषिः श्री सीताराम चन्द्रोदेवता अनुष्टुप् छन्दः सीता शक्तिः 

श्रीमद् हनुमान् कीलकं श्रीरामचन्द्र प्रीत्यर्थ रामरक्षा स्तोत्रजपे विनियोगः

अथ ध्यानम्

ध्यायेदाजानुबाहुं धृतशर धनुषं बद्ध पद्मासनस्थं । पीतं वासोवसानं नवकमल दलस्पर्थि नेत्रं प्रसन्नम् । 

वामाङ्कारूढ सीतामुख कमल मिलल्लोचनं नीरदाभं । नानालङ्कार दीप्तं दधतमुरु जटामण्डलं रामचन्द्रम् ।

चरितं रघुनाथस्य शतकोटि प्रविस्तरम् । एकैकमक्षरं पुंसां महापातक नाशनम् ।

ध्यात्वा नीलोत्पल श्यामं रामं राजीवलोचनम् । जानकी लक्ष्मणोपेतं जटामुकुट मण्डितम् ।

सासितूण धनुर्बाण पाणिं नक्तं चरान्तकम् । स्वलीलया जगत्रातु माविर्भूतमजं विभुम् ।

रामरक्षां पठेत्प्राज्ञः पापघ्नीं सर्वकामदाम् । शिरो मे राघवः पातु फालं दशरथात्मजः ।

कौसल्येयो दृशौपातु विश्वामित्र प्रियः शृती । घ्राणं पातु मखत्राता मुखं सौमित्रिवत्सलः ।

जिह्वां विद्यानिधिः पातु कण्ठं भरत वन्दितः । स्कन्धौ दिव्यायुधः पातु भुजौ भग्नेशकार्मुकः।

करौ सीतापतिः पातु हृदयं जामदग्न्यजित् । मध्यं पातु खरध्वंसी नाभिं जाम्बवदाश्रयः ।

सुग्रीवेशः कटीपातु सक्थिनी हनुमत्-प्रभुः । ऊरू रघूत्तमः पातु रक्षकुल विनाशकृत् ।

जानुनी सेतुकृत् पातु जङ्घे दशमुखान्तकः । पादौविभीषण श्रीदःपातु रामो‌உखिलं वपुः ।

एतां रामबलोपेतां रक्षां यः सुकृती पठेत् ।सचिरायुः सुखी पुत्री विजयी विनयी भवेत् ।

पाताल भूतल व्योम चारिणश्-छद्म चारिणः । न द्रष्टुमपि शक्तास्ते रक्षितं रामनामभिः ।

रामेति रामभद्रेति रामचन्द्रेति वास्मरन् । नरो नलिप्यते पापैर्भुक्तिं मुक्तिं च विन्दति ।

जगज्जैत्रैक मन्त्रेण रामनाम्नाभि रक्षितम् । यः कण्ठे धारयेत्तस्य करस्थाः सर्व सिद्धयः ।

वज्रपञ्जर नामेदं यो रामकवचं स्मरेत् । अव्याहताज्ञः सर्वत्र लभते जय मङ्गलम् ।

आदिष्टवान् यथास्वप्ने राम रक्षा मिमां हरः । तथा लिखितवान् प्रातः प्रबुद्धौ बुधकौशिकः।

आरामः कल्पवृक्षाणां विरामः सकलापदाम् । अभिराम स्त्रिलोकानां रामः श्रीमान्सनः प्रभुः ।

तरुणौ रूपसम्पन्नौ सुकुमारौ महाबलौ । पुण्डरीक विशालाक्षौ चीरकृष्णा जिनाम्बरौ ।

फलमूलासिनौ दान्तौ तापसौ ब्रह्मचारिणौ । पुत्रौ दशरथस्यैतौ भ्रातरौ रामलक्ष्मणौ ।

शरण्यौ सर्वसत्वानां श्रेष्टा सर्व धनुष्मतां । रक्षःकुल निहन्तारौ त्रायेतां नो रघूत्तमौ ।

आत्त सज्य धनुषा विषुस्पृशा वक्षयाशुग निषङ्ग सङ्गिनौ । 

रक्षणाय मम रामलक्षणावग्रतः पथिसदैव गच्छतां ।

सन्नद्धः कवची खड्गी चापबाणधरो युवा । गच्छन् मनोरथान्नश्च रामः पातु स लक्ष्मणः ।

रामो दाशरथि श्शूरो लक्ष्मणानुचरो बली ।काकुत्सः पुरुषः पूर्णः कौसल्येयो रघूत्तमः ।

वेदान्त वेद्यो यज्ञेशः पुराण पुरुषोत्तमः । जानकीवल्लभः श्रीमान अप्रमेय पराक्रमः ।

इत्येतानि जपेन्नित्यं मद्भक्तः श्रद्धयान्वितः । अश्वमेथाधिकं पुण्यं सम्प्राप्नोति नसंशयः ।

रामं दूर्वादल श्यामं पद्माक्षं पीतावाससं । स्तुवन्ति नाभिर्-दिव्यैर्-नते संसारिणो नराः ।

रामं लक्ष्मण पूर्वजं रघुवरं सीतापतिं सुन्दरं । काकुत्सं करुणार्णवं गुणनिधिं विप्रप्रियं धार्मिकं ।

राजेन्द्रं सत्यसन्धं दशरथतनयं श्यामलं शान्तमूर्तिं । वन्देलोकाभिरामं रघुकुल तिलकं राघवं रावणारिम् ।

रामाय रामभद्राय रामचन्द्राय वेथसे । रघुनाथाय नाथाय सीतायाः पतये नमः ।

श्रीराम राम रघुनन्दन राम राम । श्रीराम राम भरताग्रज राम राम ।

श्रीराम राम रणकर्कश राम राम । श्रीराम राम शरणं भव राम राम ।

श्रीराम चन्द्र चरणौ मनसा स्मरामि । श्रीराम चन्द्र चरणौ वचसा गृह्णामि । 

श्रीराम चन्द्र चरणौ शिरसा नमामि । श्रीराम चन्द्र चरणौ शरणं प्रपद्ये ।

मातारामो मत्-पिता रामचन्द्रः स्वामी रामो मत्-सखा रामचन्द्रः  । 

सर्वस्वं मे रामचन्द्रो दयालुः नान्यं जाने नैव जाने न जाने । 

दक्षिणेलक्ष्मणो यस्य वामे च जनकात्मजा । पुरतोमारुतिर्-यस्य तं वन्दे रघुवन्दनम् ।

लोकाभिरामं रणरङ्गधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं । कारुण्यरूपं करुणाकरं तं श्रीरामचन्द्रं शरण्यं प्रपद्ये ।

मनोजवं मारुत तुल्य वेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्टं । वातात्मजं वानरयूथ  मुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये ।

कूजन्तं रामरामेति मधुरं मधुराक्षरं । आरुह्यकविता शाखां वन्दे वाल्मीकि कोकिलम् ।

आपदामपहर्तारं दातारं सर्वसम्पदां । लोकाभिरामं श्रीरामं भूयोभूयो नमाम्यहं ।

भर्जनं भवबीजानाम् मर्जनं सुखसम्पदां ।तर्जनं यमदूतानां राम रामेति गर्जनम् ।

रामो राजमणिः सदा विजयते रामं रमेशं भजे । रामेणाभिहता निशाचरचमू रामाय तस्मै नमः । 

रामान्नास्ति परायणं परतरं रामस्य दासोस्म्यहं । रामे चित्तलयः सदा भवतु मे भो राम मामुद्धर ।

श्रीराम रामेति रामेति रमे रामे मनोरमे । सहस्रनाम तत्तुल्यं राम नाम वरानने

इति श्रीबुधकौशिक विरचितं श्रीराम रक्षास्तोत्रं सम्पूर्णं ।

||श्री रामचन्द्रार्पण मस्तु ||

जटायुकृत श्री राम स्तोत्र || Jatayu Kruta Shri Rama Stotram

जटायुरुवाच

अगणितगुणमप्रमेयमाद्यं सकलजगत्स्थितिसंयमादिहेतुम् ।

उपरमपरमं परात्मभूतं सततमहं प्रणतोऽस्मि रामचन्द्रम् ॥ १ ॥

निरवधिसुखमिन्दिराकटाक्षं क्षपितसुरेन्द्रचतुर्मुखादिदुःखम् ।

नरवरमनिशं नतोऽस्मि रामं वरदमहं वरचापबाणहस्तम् ॥ २ ॥

त्रिभुवनकमनीयरूपमीड्यं रविशतभासुरमीहितप्रदानम् ।

शरणदमनिशं सुरागमूले कृतनिलयं रघुनन्दनं प्रपद्ये    ॥ ३ ॥

भवविपिनदवाग्निनामधेयं भवमुखदैवतदैवतं दयालुम् ।

दनुजपतिसहस्रकोटिनाशं रवितनयासदृशं हरिं प्रपद्ये     ॥ ४ ॥

अविरतभवभावनातिदूरं भवविमुखैर्मुनिभिस्सदैव दृश्यम् ।

भवजलधिसुतारणाङ्घ्रिपोतं शरणमहं रघुनन्दनं प्रपद्ये  ॥ ५ ॥

गिरिशगिरिसुतामनोनिवासं गिरिवरधारिणमीहिताभिरामम् ।

सुरवरदनुजेन्द्रसेविताङ्घ्रिं सुरवरदं रघुनायकं प्रपद्ये      ॥ ६ ॥

परधनपरदारवर्जितानां परगुणभूतिषु तुष्टमानसानाम् ।

परहितनिरतात्मनां सुसेव्यं रघुवरमम्बुजलोचनं प्रपद्ये   ॥ ७ ॥

स्मितरुचिरविकासिताननाब्जमतिसुलभं सुरराजनीलनीलम् ।

सितजलरुहचारुनेत्रशोभं रघुपतिमीशगुरोर्गुरुं प्रपद्ये       ॥ ८ ॥

हरिकमलजशंभुरूपभेदात्त्वमिह विभासि गुणत्रयानुवृत्तः ।

रविरिव जलपूरितोदपात्रेष्वमरपतिस्तुतिपात्रमीशमीडे     ॥ ९ ॥

रतिपतिशतकोटिसुन्दराङ्गं शतपथगोचरभावनाविदूरम् ।

यतिपतिहृदये सदा विभातं रघुपतिमार्तिहरं प्रभुं प्रपद्ये   ॥ १० ॥

इत्येवं स्तुवतस्तस्य प्रसन्नोऽभूद्रघूत्तमः ।

उवाच गच्छ भद्रं ते मम विष्णोः परं पदम्                      ॥ ११ ॥

शृणोति य इदं स्तोत्रं लिखेद्वा नियतः पठेत् ।

स याति मम सारूप्यं मरणे मत्स्मृतिं लभेत्                  ॥ १२ ॥

इति राघवभाषितं तदा श्रुतवान् हर्षसमाकुलो द्विजः ।

रघुनन्दनसाम्यमास्थितः प्रययौ ब्रह्मसुपूजितं पदम्       ॥ १३ ॥

श्री रघुनन्दनार्पणमस्तु  

रामरक्षेच्या एका श्लोकाबद्दल- कदाचित माहिती असेलही सगळ्यांना....

रामो राजमणिः सदा विजयते रामं रामेशं भजे ।

रामेणाभिहतो निशाचरचमू रामाय तस्मै नमः । 

रामान्नास्ति परायणं परतरं रामस्य दासो$सम्यहम् ।

रामे चित्तलयः सदा भवतु मे भो राम मामुद्धर ।।

या श्लोकात राम या नामाच्या सगळ्या विभक्ती आल्या आहेत. रामो=रामः(प्रथमा) रामं(द्वितीया), रामेण(तृतीया), रामाय(चतुर्थी), रामान्नास्ति=रामात् (पंचमी)रामस्य(षष्ठी), रामे(सप्तमी),भो राम(संबोधन).

ह्या श्लोकात रकाराची पुनरावृत्ती असल्याने गर्भारपणात हा श्लोक म्हणल्याने जन्माला येणारे बाळ बोबडे (किंवा जीभ जड असलेले) होत नाही.

: रामरक्षा: आरोग्यरक्षक कवच!!! 

एक वेगळा पैलू तुमच्यासमोर मांडत आहे. श्रीरामरक्षा स्तोत्र हे आजही कित्येक घरांमध्ये तिन्हीसांजेला आवर्जून म्हटले जाते. आजारी व्यक्ती वा शस्त्रक्रिया झाल्यानंतर त्या रुग्णाला रामरक्षा ऐकवली जाते. रामरक्षाच का? असे काय रहस्य या मंत्रात दडले आहे?

रामनामकवच:

शिरो मे राघवः पातु भालं दशरथात्मजः ॥४॥

कौसल्येयो दृशौ पातु विश्वामित्रप्रियः श्रुती ।

घ्राणं पातु मखत्राता मुखं सौमित्रिवत्सलः ॥५॥

जिह्वां विद्यानिधिः पातु कण्ठं भरतवंदितः ।

स्कंधौ दिव्यायुधः पातुभुजौ भग्नेशकार्मुकः ॥६॥

करौ सीतापतिः पातु हृदयं जामदग्न्यजित्‌ ।

मध्यं पातु खरध्वंसी नाभिं जाम्बवदाश्रयः ॥७॥

सुग्रीवेशः कटी पातु सक्थिनी हनुमत्प्रभुः ।

उरू रघूत्तमः पातु रक्षःकुलविनाशकृत्‌ ॥८॥

जानुनी सेतुकृत्पातु जंघे दशमुखान्तकः ।

पादौ विभीषणश्रीदः पातु रामोऽखिलं वपुः ॥९॥

असे कवच या स्तोत्रात आलेले आहे. कवच म्हणजे आपल्या प्रत्येक अवयवाचे रक्षण करण्यासाठी मंत्र धारण करणे!! थोडक्यात; आपले संपूर्ण शरीरच रामनामाने अभिमंत्रित करणे. या कवचाची फलश्रुती मनीट पहा....

पातालभूतलव्योम चारिणश्छद्मचारिणः ।

न द्रष्टुमपि शक्तास्ते रक्षितं रामनामभिः ॥ ११ ॥

म्हणजे, पाताळ, भूमी आणि आकाश या तिन्ही लोकांत संचार करणारे, छद्मचारिणः म्हणजे खोटे सोंग घेणारे असे (राक्षस) रामनामाने रक्षिलेल्या लोकांकडे नजर वर उचलून पण पाहू शकत नाहीत!!

आता, थोडं थांबा....'छद्मचारिणः' हा शब्द पुन्हा वाचा. काही आठवलं? विज्ञान शिकत असताना 'pseudopodium' हा शब्द आपण शिकलेला असतो. अमिबासारखे जीव हे pseudopodium म्हणजे छद्मपाद म्हणून ओळखले जातात!! थोडक्यात; इथे 'राक्षस' शिंगं वगैरे असलेले राक्षस नसून सूक्ष्मजीव आहेत. आयुर्वेदात विशेषतः सुश्रुत संहितेत कृमी, राक्षस असे शब्द अनेक ठिकाणी सूक्ष्मजीवांसाठी वापरण्यात आलेले आहेत.

आजवर वैद्यकीय उपचार करत असताना; अनेक वेळेला रामरक्षेचा लाभ झालेला कित्येकांनी अनुभवला आहे.

श्री सीतारामचन्द्रार्पणमस्तु 

No comments:

Post a Comment