श्रीनंदनंदना
बाळा जो जो रे कुलभूषण । श्रीनंदनंदना ।।
निद्रा करि बाळा मनमोहना । परमानंदा कृष्णा ।।
बाळा जो जो रे।।धृ।।
जन्मुनि मथुरेत यदुकुळ । आलासी वनमाळी ।।
पाळणा लांबविला गोकुळीं। धन्य केले गौळी ।।
बाळा जो जो रे ।। १ ।।
बंदीशाळेत अवतरूनी । द्वारे मोकलुनी ।।
जनकशृंखला तोडूनी । यमुना दुभंगोनी ।।
बाळा जो जो रे ।। २ ।।
मार्गी नेतांना श्रीकृष्ण मेघनिवारणा ॥
शेष धांवला तत्क्षणी । उंचावूनी फणा ।।
बाळा जो जो रे ।। ३ ।।
रत्नजडित पालख । झळके अमोलिक ।।
वरती पहुडले कुलतिलक । वैकंठनायक।।
बाळा जो जो रे ।। ४ ।।
हालवी यशोदा सुन्दरी । धरूनि हाती ज्ञानदोरी ।।
पुष्ये वर्षिली सुरवरी। गर्जति जयजयकारी ।।
बाळा जो जो रे ।। ५ ।।
विश्वव्यापक यदुराया । निद्रा करी बा सखया ।।
तुजवरी कुरवंडी करूनियां । सांडिन मी निज काया।।
बाळा जो जो रे ।। ६ ।।
गर्ग येऊनि सत्वर । सांगे जन्मांतर ।।
कृष्ण परब्रह्म साचार । आठवा अवतार ।।
बाळा जो जो रे ।। ७ ।।
विश्वव्यापी हो बालक दुष्ट दैत्यांतक ।।
प्रेमळ भक्तांवा पालख । श्री लक्ष्मीनायक ।।
बाळा जो जो रे ।। ८ ।।
विष पाजाया पूतना । येतां घेई प्राणा ।।
शकटासुराशी उताणा । पाडिले लाधे जाणा ।।
बाळा जो जो रे ।। ९ ।।
उखळा बांधता मातेनें । रांगतां श्रीकृष्ण ।।
यमलार्जुनाचे उद्धरण । दावानळ प्राशन ।।
बाळा जो जो रे ।। १० ।।
गोधन पखितां आळविला । कालिया मर्दीला ।।
दावानळ वन्ही प्राशिला । दैत्यविध्वंस केला ।।
बाळा जो जो रे ।। ११ ।।
इंद्र कोपतां धावुन । उपटी गोवर्धन ।।
गाई गोपाळां रक्षुन । केले वनभोजन ।।
बाळा जो जो रे ।। १२ ।।
कालिंदी तीरी जगदीश । ब्रजवनितांशी राम ।।
खेळुनि मारिलें कंसास । चाणूरास ।।
बाळा जो जो रे ।। १३ ||
ऐशी चरित्रे अपार । पावुनि भूमीवर ।।
पांडव रक्षिले सत्वर । ब्रह्मानंदी स्थिर ।।
बाळा जो जो रे ।। १४ ||
No comments:
Post a Comment