केसरीनंदन
निज रे क्षण राणा जगमोहना । रामाचा दासगणा ॥धृ॥
पाळणा हालविसि उदरासी । अंजनि मातें वंशी ।
पुत्र जन्मला वनजाशी । निसर्गाचे कुशी ॥१॥
बुद्धी भूत असे तल्लखे । सूर्य रश्मी अलौके ।
ऋषीगण वरsनेक कुलदिपक । त्रिन् लोक नायक ॥२॥
अंजनि केसरी चा उदरी । धरुनी सबळ दोरी ।
पुष्पे बहुपरी सुरवरी । गर्जती भवभयहारी ॥३॥
त्रिभुवन तारया मरुतराया । निद्रा करी बा सखया ।
तुजवर शरणागत होवुनिया । ठेविन आपुली काया ॥४॥
येऊनि सत्वर यतिवर । सांगे जन्मांतर ।
विश्व शक्तीचा साचार । योगी चा अवतार ॥५॥
भक्त रक्षुनिया अवधारा । वधुनी निशाचरा ।
जाईल जलधी परा वीर वरा । जाळुनि लंकापुरा ॥६॥
वर्णिले दाशरथी सुरुपा । भंगुनि उपवनतापा ।
दशाननाप्रति रूप मित कोप । प्रजा गण प्रलापा ॥७॥
रामसेतू चा माळा नळनीळा । नामे तरतिल शिळा ।
त्यावरी रामाक्षरा दयाळा । नेउनि वानर सकळा ॥८॥
समूळ मर्दन असुरगण । स्थापित राम स्मरण ।
वैदेही सहमचरण संपूर्ण । आनंदिले पुरजण ॥९॥
आयुर् बळ निकेतन संतान | यश तेज पशुधन |
मेधाशक्ती प्रदान निजज्ञान | देयी तु वरदान || १० ||
दास रामाचा भुकेला । भक्ताधीन राहिला ।
प्रतिग्रामे शोभला उभा पावला । त्रिलोक तारला ॥११॥
No comments:
Post a Comment