संग्रहित
संगीतोपचार. (Music Therapy)
संगीत उपचाराने आपण बऱ्याच त्रासांवर मात करू शकतो किंवा ते कमी करू शकतो. वेगवेगळ्या लोकांच्या वर सध्या खूप ठिकाणी असे उपचार चालू आहेत आणि याचे रिझल्ट्स खूप आश्चर्यकारक आहेत. बऱ्याच लोकांना फरक पडत आहेत. पूर्वी लोकं ग्रामोफोन वर असे बरेच राग ऐकत असतं. त्यामुळे त्यांचे आरोग्य ही उत्तम राहत असे.
खाली दिलेले सर्व राग तुम्हाला यूट्यूब वाहिनी वर मिळतील.जात्याच संगीताची आवड असणारे नसणारे एक प्रयोग म्हणून 30 दिवस दररोज 45 मिनिटे हेडफोन लावून शांत ठिकाणी यातील काही राग ऐकावा. आणि मलाही आश्चर्यकारक फरक काही जाणवले का याचि स्वयं विचार करावा. संगीतावर शास्त्रीय अभ्यास असणारे नसणारे पण संगीत आणि गाणी हा आवडता छंद म्हणून ऐकावा.
राग आणि त्यांच्या श्रवणाचे लाभ:
१. राग दुर्गा – आत्मविश्वास वाढविणारा.
२. राग यमन – कार्यशक्ती वाढवणारा.
३. राग देस – उत्थान व संतुलन साधणारा.
४. राग बिलावल – अध्यात्मिक उन्नती व संतुलन साधणारा.
५. राग हंसध्वनी – सत्य असत्याची जाणिव करून देणारा राग.
६. राग शाम कल्याण – मूलाधार उत्तेजीत करणारा व आत्मविश्वास वाढविणारा.
७. राग हमीर – आक्रमकता वाढविणारा, यश देणारा व शक्ती आणि ऊर्जा निर्माण करणारा.
८. राग केदार – स्वकर्तृत्वावर पूर्ण विश्वास निर्माण करणारा, भरपूर उर्जा निर्माण करणारा, तसेच मूलाधार उत्तेजित करणारा.
९. राग भूप – शांतता निर्माण करणारा व संतुलन साधून अहंकार संतुलनात आणणारा.
१०. राग अहिरभैरव – शुद्ध इच्छा प्रेम आणि भक्तीभाव निर्माण करणारा व आध्यात्मिक उन्नतीस पोषक वातावरण निर्मिती करून समाधान देणारा.
११. राग भैरवी – इडा नाडी सशक्त करणारा, भावनाप्रधान राग, सर्व सदिच्छा पूर्ण करून प्रेम वृध्दिंगत करणारा असा सहस्त्राराचा राग.
१२. राग मालकंस – अतिशय शांत - मधुर राग प्रेमभाव निर्माण करणारा व संसारिक सुख वृध्दिंगत करणारा.
१३. राग भैरव – शांत वृत्ती व शुध्द इच्छा निर्माण करणारा राग हा आध्यात्मिक प्रगतीस पोषक असून शिवतत्व जागृत करणारा असा आहे.
१४. राग जयजयवंती – सुख समृद्धि देणारा राग असून यश दायक आहे. विशुद्धीच्या सर्व समस्या दूर करण्याची क्षमता बाळगतो.
१५. राग भिम पलासी – संसार सुख व प्रेम देणारा.
१६. राग सारंग – कल्पना शक्ती व कार्यकुशलता वाढीस लावून नवनिर्मितीचे ज्ञान प्रदान करतो आत्मविश्वास वाढीस लावून परिस्थितीचे भान देणारा अत्यंत मधुर राग.
१७. राग गौरी – शुध्द इच्छा, मर्यादाशीलता, प्रेम, समाधान, उत्थान इत्यादी गुणवर्धक राग. डाव्या विशुद्धीच्या सर्व बाधा नाहिशा करणारा.
विशेष सूचना:-
डॉक्टरांचे उपचार घेत असताना हे संगीतोपचारही घ्यावेत, पण डॉक्टरांचे उपचार मात्र थांबवू नयेत.
हृदयरोग
राग दरबारी व राग सारंग
१) झनक झनक तोरी बाजे पायलिया( मेरे हुजूर )
२) तोरा मन दर्पण कहलाए ( काजल )
३) बहुत प्यार करते है ,तुमको सनम ( साजन )
४) जादूगर संय्या छोडो मेरी ( नागिन).
विस्मरण
लक्षात रहात नाही त्यांनी शिवरंजनी राग ऐकावा
१) मेरे नयना सावन भादों (मेहबूबा)
२) ओ मेरे सनम (संगम)
३)दिल के झरोखे मे तुझको बिठाकर(ब्रह्मचारी )
४) जाने कहा गये वो दिन(मेरा नाम जोकर )
मानसिक ताण अस्वस्थता
ज्यांना मानसिक ताण भरपूर प्रमाणात असेल त्यांनी राग बिहाग आणि राग मधुवंती वर आधारित गाणी ऐकावीत.
१) पिया बावरी ( खूबसूरत )
२) मेरे सूर और तेरे गीत (गूँज उठी शहनाई )
३) मतवारी नार ठुमक ठुमक चली(आम्रपाली)
४) तेरे प्यार मे दिलदार ( मेरे मेहबूब )
रक्तदाब
हाय ब्लड प्रेशर साठी हळू ( धीमी गती ) चालीची, तर लो ब्लड प्रेशर साठी जलद चालीची गाणी फायदेशीर ठरतात.
उच्च रक्तदाब
१) चल उड़ जा रे पंछी ( भाभी )
२) चलो दिलदार चलो ( पाकीजा )
३) नीले गगन के तले( हमराज )
४) ज्योती कलश छलके ( भाभी की चूड़ियाँ )
कमी रक्तदाब
१) जहाँ डाल डाल पर ( सिकंदरे आज़म )
२) पंख होती तो उड़ आती रे ( सेहरा )
३) ओ निंद ना मुझको आये ( पोस्ट बॉक्स नं. ९०)
रक्तक्षय अनिमिया
अशा वेळी राग पिलू वर आधारलेली गाणी ऐकावी.
१) खाली शाम हाथ आई है ( इजाजत )
२) आज सोचा तो आँसू भर आये ( हँसते जख्म )
३) नदियाँ किनारे ( अभिमान )
४) मैने रंग ली आज चुनरिया ( दुल्हन एक रात की)
अशक्तपणा
शक्ती ताकद कमी झालेली वाटतेय ,उत्साहाचा अभाव काही करण्याचा कंटाळा येतो अशा वेळी राग जयजयवंती वरील आधारित गाणी ऐकावी.
१) मोहब्बत की राहों मे चलना संभलके ( उड़न खटोला )
२) मनमोहना बड़े झूठे ( सीमा )
३) साज हो तुम आवाज हूँ मै ( चंद्रगुप्त )
पित्तविकार ॲसिसिटी
ॲसिडिटीवर उपाय म्हणून राग खमाज वर आधारित असलेली गाणी ऐकावीत.
१) छूकर मेरे मन को ( याराना )
२) तुम कमसीन हो नादा हो ( आई मिलन की बेला )
३) आयो कहाँ से घनश्याम ( बुढ्ढा मील गया )
४) तकदीर का फसाना जाकर किसे सुनाये ( सेहरा )
राग केदार:
१) हमको मन की शक्ती देना ( गुड्डी)
२) आपकी नजरो मे (घर)
३) पल दो पल के ( द बर्निंग ट्रेन)
४) दर्शन दो घनश्याम नाथ मोरी
राग भैरवी:
१) तुमी हो माता पिता तुमी हो
२) ये गलिया ये चौबरा ( प्रेमरोग)
३) दिल दिया हैं जान भी देंगे ( कर्मा)
४) दुनिया बनाने वाले क्या तेरे मन मे ( तिसरी कसम)
राग यमन:
१) धुंदी कळ्यांना ( धाकटी बहीण)
२) जिथे सागरा धरणी मिळते (पुत्र व्हावा ऐसा)
३) इक प्यार का नगमा है( शोर)
४) नाम गुम जायेगा ( किनारा)
राग मालकंस:
१) आधा है चंद्रमा रात आधी ( नवरंग)
२) पग घुंगरू बांधे मिरा नाचे( नमक हलाल)
३) दिल पुकारे आरे आरे (jewel thief)
४) ये मालिक तेरे बंधे हम ( दो आंखे बाराह हाथ)
राग अहिरभैरव:
१) तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल
२) अलबेला सजन आयो रे ( हे गाणे हम दिल दे चुके सनम मधले न ऐकता बाजीराव मस्तानी ह्या सिनेमातले ऐकावे)
३) सोला बरस की बाली उमर को सलाम ( एक दुजे के लिये)
४) कोमल काया विमोह माया ( नटरंग)
राग हंसध्वनी:
१) अखेरचा हा तुला दंडवत( मराठा तितुका मिळवावा)
२) अग नाच नाच राधे उडवूया रंग ( गोंधळात गोंधळ)
राग भूप:
१) इन आंखो की मस्ती के ( उमराव जान)
२) देखा एक ख्वाब तो सिलसिले हुये (सिलसिला)
३) कांची रे कांची ( हरे राम हरे कृष्ण)
४) सायोनारा ( लव इन टोकियो)
राग आसावरी:
१) इक राधा इक मीरा ( राम तेरी गंगा मैली)
२) मेरे महबूब कयामत होगी ( Mr. X in Bombay)
३) हम तेरे बिन अब रह नही सकते (आशिकी)
४) कौन तुझे यू प्यार करेगा (MS Dhoni)
राग दुर्गा:
१) सावन का महिना, पवन करे शोर ( मिलन)
२) तू इस तरह से मेरे जिंदगी में शामील है ( आप तो ऐसे ना थे)
राग देस:
१) वंदे मातरम्
२) प्यार हुआ छुपके से ( 1942 love story)
३) अजी रुठकर कर के कहा जायेंगे ( आरजू)
४) चदरिया झिनी रे झिनी ( जुदाई)
राग बिलावल:
१) लग जा गले ( वो कौन थी)
२) जय जय संतोषी माता ( जय संतोषी माता)
३) जण गण मन अधिनायक
४) ओम जय जगदीश हरे
राग श्यामकल्याण:
१) शूरा मी वंदिले
राग भिमपलासी:
१) तू चीज बडी है मस्त मस्त ( मोहरा)
२) ये अजनबी तू भी कभी ( दिल से)
३) तू मिले दिल खिले ( Criminal)
४) नैनो मे बदरा सावन (मेरा साया)
रागाची चव कळावी म्हणून सर्वपरिचित चित्रपटगीते दिली आहेत. जेव्हा केव्हा favourite गाणी ऐकत असता तेव्हा ती कोणत्या रागावर आधारित आहे हे आवर्जून पाहावा.
प्रत्यक्ष राग- सर्वांगाने सजवलेला- सवाद्य ऐकणे अधिक लाभदायक ठरेल.
No comments:
Post a Comment