संत जनाबाई हरीपाठ अभंग
सोड रवि हात काह्ना करुदे मंथन कृष्ण करुदे मंथन |
दारी उभ्या गोपिका तुला मारिताति हाका |
आलि आलि ग राधिका नेत्रचा खुणा कृष्ण करुदे मंथन |दही दूध तूप लोणि तुला देते चक्रपाणी |
अजून तरी राही सदनी मन मोहन कृष्ण करुदे मंथन | जनी म्हणे ना ना रीति हरी प्रेमे समझाविति घालितसे श्री पति अंतराचा खुणा कृष्ण करुदे मंथन |
१
झाडलोट करी जनी । केर भरी चक्रपाणी ॥१॥
पाटी घेऊनियां शिरीं । नेऊनियां टाकी दुरी ॥२॥
ऐसा भक्तिसी भुलला । नीच कामें करुं लागला ॥३॥
जनी ह्मणे विठोबाला । काय उतराई होऊं तुला ॥४॥
२
पूर्वी काय तप नेणें पैं हो केलें । निधान जोडिलें पंढरीचें ॥१॥ येऊनियां देव दळूं लागे अंगें । रखुमाईचा संग दूर केला ॥२॥ तैसाचि पैं संगें येऊनि बाहेरी । वेंचोनियां भरी शेणी अंगें ॥३॥ ओझें झालें ह्मणूनि पाठी पितांबरी । घेऊनियां घरीं आणितसे ॥४॥ ऐसें जेथें काम करी चक्रपाणी । तेथें कैंची जनी नामयाची ॥५॥
३
एकटी तूं गाणें गासी । दुजा शब्द उमटे पाशीं ॥१॥
कोण गे तुझ्या बरोबरी । गाणें गाती निरंतरीं ॥२॥
पांडुरंग माझा पिता । रखुमाई झाली माता ॥३॥
ऐशियाच्या घरीं आलें । जनी ह्मणे धन्य झालें ॥४॥
४
जनी डोईनें गांजली । विठाबाई धाविन्न्ली ॥१॥
देव हातें बुचडा सोडी । उवा मारीतसे तांतडी ॥२॥
केश विंचरुनी मोकळे केले । जनी ह्मणे निर्मळ झालें ॥३॥
५
जनी बैसली न्हायाला । पाणी नाहीं विसणाला ॥१॥घागर घेउनी पाण्या गेली । मागें मागें धांव घाली ॥२॥घागर घेऊनियां हातीं । पाणी रांजणांत ओती ॥३॥ऐशा येरझारा केल्या । रांजण घागरी भरिल्या ॥४॥पाणी पुरे पांडुरंगा । दासी जनीच्या अंतरंगा ॥५॥
६
एके दिवशीं न्हावयास । पाणी नव्हतें विसणास ॥१॥देव धांवोनियां आले । शीतळ उदक घे घे बोले ॥२॥आपुल्या हातें विसणीं । घाली जनीच्या डोयी पाणी ॥३॥माझ्या डोईच्या केसांस । न्हाणें नव्हतें फार दिवस ॥४॥तेणें मुरडी केसांस । कां ह्मणे उगीच बैस ॥५॥आपुल्या हातें वेणी घाली । जनी ह्मणे माय झाली ॥६॥
७
तुळशीचे बनीं । जनी उकलीत वेणी ॥१॥हातीं घेऊनियां लोणी । डोई चोळी चक्रपाणी ॥२॥माझे जनीला नाहीं कोणी । ह्मणुनी देव घाली पाणी ॥३॥जनी सांगे सर्व लोकां । न्हांऊं घाली माझा सखा ॥४॥
८
साळी सडायास काढी । पुढें जाउनी उखळ झाडी ॥१॥कांडितां कांडितां । शीण आला पंढरिनाथा ॥२॥सर्व अंगीं घाम आला । तेणें पितांबर भिजला ॥३॥पायीं पैंजण हातीं कडीं । कोंडा पांखडूनि काढी ॥४॥हाता आला असे फोड । जनी ह्मणे मुसळ सोड ॥५॥
९
ज्याचा सखा हरी । त्यावरी विश्व कृपा करी ॥१॥उणें पडों नेदी त्याचें । वारें सोसी आघाताचें ॥२॥तयावीण क्षणभरी । कदा आपण नव्हे दुरी ॥३॥आंगा आपुले ओढोनी । त्याला राखे जो निर्वाणीं ॥४॥ऐसा अंकित भक्तांसी । ह्मणे नामयाची दासी ॥५॥
१०
पक्षी जाय दिगंतरां । बाळकांसी आणी चारा ॥१॥घार हिंडते आकाशीं । झांप घाली पिल्लापासीं ॥२॥माता गुंतली कामासी । चित्त तिचें बाळापाशीं ॥३॥वामर हिंडे झाडावरी । पिलीं बांधुनी उदरीं ॥४॥तैंसी आह्यासी विठ्ठल माये । जनी वेळोवेळां पाहे ॥५॥
११
भक्त जें जें कर्म करिती । तें तूं होसी कृपामूर्ती ॥१॥हें तों नवल नव्हे देवा । भुललासी भक्तिभावा ॥२॥वाग्दोर धरुनी दांतीं । चारी घोडे चहूं हातीं ॥३॥धूतां लाज नाहीं तुला । दासी जनी ह्मणे भला ॥४॥
१२
देव भावाचा लंपट । सोडुनी आला हो वैकुंठ ॥१॥पुंडलिकापुढें उभा । सम चरणांवरी शोभा ॥२॥हातीं चक्र पायीं वांकी । मुख भक्तांचें अवलोकीं ॥३॥उभा बैसेन सर्वथा । पाहे कोडें भक्त कथा ॥४॥सर्व सुखाचा सागर । जनी ह्मणे शारंगधर ॥५॥
१३
दुःशासन द्रौपदीसी । घेउनी आला तो सभेसी ॥१॥दुर्योधन आज्ञा करी । नग्न करावी सुंदरी ॥२॥आतां उपाय कृष्णा काय । धांवें माझे विठ्ठल माय ॥३॥निरी ओढितां दुर्जन । झालें आणिक निर्माण ॥४॥ऐसीं असंख्य फेडिलीं । देवीं तितुकीं पुरविलीं ॥५॥तया संतां राखिलें कैसें । जनी मनीं प्रेमें हांसे ॥६॥
१४
ब्राह्मणाचें पोर । मागे दूध रडे फार ॥१॥माता ह्मणे बालकासी । दूध मागें देवापासी ॥२॥क्षिराब्धीची वाटी । ह्मणे जनी लावी ओंठीं ॥३॥
१५
पंढरीच्या राया । माझी विनवणी पायां ॥१॥काय वर्णू हरिच्या गोष्टी । अनंत ब्रह्मांडें याचे पोटीं ॥२॥सेना न्हावी याचे घरीं । अखंड राबे विठ्ठल हरी ॥३॥राम चिंता ध्यानीं मनीं । ह्मणे नामयाची जनी ॥४॥
१६
भिल्लणीचीं फळें कैशीं । चाखोनी वाहातसे देवासी ॥१॥भावें तिचीं अंगिकारी । सर्वाहुनी कृपा करी ॥२॥गुज वान्नरांसी पुसावें । राक्षसांतें हो जिंकावें ॥३॥वान्नर अवघे भुभुःकार । बोलताती रामासमोर ॥४॥आज्ञा करावी आह्मांसी । रावण आणितों तुह्मापासीं ॥५॥तुझ्या नामच्या प्रतापें । हनुमंत गेला जी संतापें ॥६॥सीताशुद्धि करुनी आला । दासी जनीस आनंद झाला ॥७॥
१७
यातिहीन चोखामेळा । त्यासी भक्तांचा कळवळा ॥१॥त्याचा झाला ह्मणीयारा । राहे घरीं धरी थारा ॥२॥देह बाटविला त्याणें । हांसे जनी गाय गाणें ॥३॥
१८
चोखामेळा संत भला । तेणें देव भुलवीला ॥१॥भक्ति आहे ज्याची मोठी । त्याला पावतो संकटीं ॥२॥चोख्यामेळ्याची करणी । तेणें देव केला ऋणी ॥३॥लागा विठ्ठल चरणीं । ह्मणे नामयाची जनी ॥४॥
१९
माळियाचा लेक झाला । सेखी कुर्म्यालागीं गेला ॥१॥चांभार्यानें जानव्यासी । काढोन दाविलें भटांसी ॥२॥तुरका घरीं विणी । ह्मणे नामयाची जनी ॥३॥
२०
माझा लोभ नाहीं देवा । तुझी करीं ना मी सेवा ॥१॥नाहीं अंगीं थोरपण । मिथ्या धरिसी गुमान ॥२॥रामा येऊनि काय करिसी । तुझें बळ आह्मांपासीं ॥३॥नाहीं सामर्थ्य तुज हरी । जनी ह्मणे धरिला चोरीं ॥४॥
२१
द्रौपदीकारण । पाठीराखा नारायण ॥१॥गोरा कुंभाराच्यासंगें । चिखल तुडवूं लागे अंगें ॥२॥कबिराच्या बैसोनि पाठीं । शेले विणितां सांगे गोष्टी ॥३॥चोखामेळ्यासाठीं ढोरें ओढी जगजेठी ॥४॥जनीसंगें दळूं लागे । सुरवर म्हणती धन्य भाग्यें ॥५॥
२२
देव भक्तांचा अंकित । कामें त्याचीं सदा करित ॥१॥त्याचें पडों नेदी उण । होय रक्षिता आपण ॥२॥जनी ह्मणे भक्तिभाव । देवदास ऐक्य जीव ॥३॥
२३
बाळे भोळे ठकविशी । तें तंव न चले आह्मांपाशीं ॥१॥गर्व धरिसी नामाचा । सोहं सोहं गर्जे वाचा ॥२॥आशा तृष्णा तुह्मांपाशीं । नाहीं ह्मणे जनी दासी ॥३॥
२४
जेवीं जेवीं बा मुरारी । तुज वाढिली शिदोरी ॥१॥कनकाचे ताटीं । रत्नजडित ठेविली वाटी ॥२॥आमुचें ब्रह्म सारंग पाणी । हिंडतसे रानोरानीं ॥३॥गोपाळांचे मेळीं । हरि खेळे चेंडूफळी ॥४॥तुळसीचे वनीं । उभी राहे दासी जनी ॥५॥
२५
जनी म्हणे पांडुरंगा । माझ्या जीवींच्या जीवलगा ।विनविते सांगा । महिमा साधुसंतांची ॥१॥कैसी वसविली पंढरी । काय महिमा भीमातीरीं ।पुंडलिकाच्या द्वारीं । कां उभा राहिलासी ॥२॥कैसा आला हा गोविंद । कैसा झाला वेणुनाद ।येउनी नारद कां राहिला ॥३॥कृपा करा नारायणा । सांगा अंतरींच्या खुणा ।येऊं दे करुणा । दासी जनी विनवितसे ॥४॥

श्री पुंडलिक वरदे हरी विठ्ठल

No comments:
Post a Comment