नवनाथ भक्तिसार हा नवनाथ संप्रदायातील सिद्धांच्या चरित्रकथांचा मराठी भाषेतील ग्रंथ आहे. 'धुंडिसुत मालु नरहरी' नावाच्या रचनाकाराने हा ग्रंथ रचला आहे. या ग्रंथाच्या समारोपातील ओव्यांनुसार, हा ग्रंथ शके १७४१ प्रमाथी संवत्सरात ज्येष्ठ शुद्ध पौर्णिमेस लिहून पूर्ण झाला. नवनाथ भक्तिसार हा नवनाथ संप्रदायातील सिद्धांच्या चरित्रकथांचा मराठी भाषेतील ग्रंथ आहे. 'धुंडिसुत मालु नरहरी' नावाच्या रचनाकाराने हा ग्रंथ रचला आहे. या ग्रंथाच्या समारोपातील ओव्यांनुसार, हा ग्रंथ शके १७४१ प्रमाथी संवत्सरात ज्येष्ठ शुद्ध पौर्णिमेस लिहून पूर्ण झाला.
अध्याय १ : रोज वाचन केल्याने ( किंवा फक्त श्रवणानेही ) घरातील समंधबाधा नाहीशी होते.
अध्याय २ : अपार धनप्राप्ती होते.
अध्याय ३ : शत्रूचा नाश होतो.
अध्याय ४ : कपटाची बंधने सुटतील, कारस्थाने दूर होतील, शत्रूचा पराभव होईल.
अध्याय ५ : घरात भूतबाधा ( पिशाच्च ) असेल तर, ती निघून जातील व पुन्हा होणार नाही.
अध्याय ६ : शत्रूचे हृदय पालटेल, त्याच्या मनातील कपट दूर होऊन तो मित्र होईल.
अध्याय ७ : ८४ लाख योनीत जन्म येणार नाही. व्यथा, चिंता संपेल. (यासाठी या अध्यायाचे त्रिकाल वाचन करावे.)
अध्याय ८ : दूरदेशी गेलेला मित्र (प्रिय व्यक्ती) परत येईल. काळजी संपेल.
अध्याय ९ : चौदा विदया आणि चौसष्ट कला प्राप्त होऊ शकतील.
अध्याय १० : स्त्री - दोष नाहीसे होतील. मन सात्वीक होईल. मुले जगतील .
अध्याय ११ : अग्निपीडा दूर होईल, गृहदोष संपतील, संततीची व संपत्तीची प्राप्ती होईल.
अध्याय १२ : देवतांचा क्षोभ संपेल व देवता अनुग्रह करतील, सुख देतील.
अध्याय १३ : स्त्री - हत्येचा दोष संपेल व पूर्वजांचा उद्धार होईल.
अध्याय १४ : कारागृहातून सुटका, निर्दोषपणे लोकांत राहता येईल.
अध्याय १५ : घरातील व बाहेरची भांडणे थांबून सुख - शांती लाभेल.
अध्याय १६ : वाईट स्वप्नांचा नाश होईल.
अध्याय १७ : योगसिध्दि लाभेल व सन्मार्गाची प्राप्ती होईल. वाईट विचार नष्ट होतील.
अध्याय १८ : ब्रम्हहत्येचा दोष संपेल, कुंभीपाक नरकातून पितरांचा (पूर्वजांचा) उद्धार होईल.
अध्याय १९ : परमानंददायी मोक्षमार्ग खुला होईल.
अध्याय २० : मन ताब्यात येऊन प्रपंच सुखी होईल. वेड दूर होईल.
अध्याय २१ : गो - हत्येचे पातक संपेल व तपोलोकात प्रवेश होईल.
अध्याय २२ : ज्ञानसंपन्न संतती होईल व ती विद्वानांना मान्य होईल.
अध्याय २३ : घरातील सुवर्ण टिकून राहील.
अध्याय २४ : बालहत्या दोष संपेल व मुले सुखी होतील.
अध्याय २५ : शाप लागणार नाही, मनुष्य जन्म मिळेल. सुंदर पतिव्रता स्त्री व पुत्र लाभेल.
अध्याय २६ : गो - हत्येचा दोष संपेल व मुले शत्रुतुल्य होणार नाहीत.
अध्याय २७ : हरवलेली वस्तू मिळेल, गेलेला अधिकार ( स्थान ) परत मिळेल.
अध्याय २८ : गुणवान स्त्रीशी लग्न होईल व ती अखंड सेवा करेल.
अध्याय २९ : क्षयरोग बरा होऊन त्रिविध ताप संपेल.
अध्याय ३० : चोरांची दृष्टी नाहीशी होईल. चोरांचे भय राहणार नाही.
अध्याय ३१ : शाबरी मंत्राचे कपटी प्रयोग आपणावर होणार नाहीत.
अध्याय ३२ : गंडांतरे संपतील, आयुष्य वाढेल.
अध्याय ३३ : धनुर्वात होणार नाही व झाला असेल तर बरा होईल.
अध्याय ३४ : सर्व कर्मसिद्धी होऊन जीवन यशस्वी होईल.
अध्याय ३५ : महासिध्दी प्राप्त होऊन बेचाळीस पिढ्यांचा उध्दार होईल.
अध्याय ३६ : साप व विंचू यांचे विष उतरून मनुष्य बरा होईल.
अध्याय ३७ : दु:शीलपणा संपून विदया प्राप्त होईल.
अध्याय ३८ : हिवताप, नवज्वर व इतर ताप नाहीसे होतील.
अध्याय ३९ : युध्दात विजय प्राप्त होऊ शकेल.
अध्याय ४० : कामधेनूप्रमाणे सर्व इच्छा पूर्ण होतील. संपूर्ण नवनाथ वाचनाने पुण्य वाढेल. सर्व गोष्टी प्राप्त होतील.



No comments:
Post a Comment