Wednesday, October 14, 2020

GLOBAL POWER (वैश्विक सामर्थ्य)

आपण रस्ते,वीज, पाणी इत्यादी वेगवेगळ्या सुविधा वापरण्यासाठी टॅक्स भरत असतो. पण हवा, नदीचे पाणी, सूर्यप्रकाश, झाडे, ऑक्सिजन यापासून मिळणारा आनंद आणि सुविधा यासाठी आपण कोणताही टॅक्स भरत नाही. उलट वाहने वापरून, जंगले तोडून, कारखाने उभारून आपण आपल्याला फुकट मिळालेल्या या सुविधांचा नाश करत असतो. पण निसर्ग आपल्याकडून याबद्दलचा टॅक्स वसूल केल्या शिवाय राहत नाही. गेल्या नोव्हेंबर महिन्यात(२०१९) दिल्लीमध्ये पर्यावरण प्रदूषणामुळे लोकांना श्वास घेता येईना. पाच दिवस शाळा-कॉलेज, ऑफिसेस बंद होती आणि काही मोबदल्यात चेंबर वर जाऊन लोकांना शुद्ध हवा पंधरा मिनिटे इन्हेल करता येत होती. 

आणि ही स्थिती अजून भयावह होत जाणार आहे. शास्त्रज्ञ सतत वॉर्निंग देत आहेत. या भयावह वातावरणात आपला श्वासोच्छवास चालला आहे. त्यामुळे ओघानेच मनावर परिणाम होत आहे. समाजातील दुष्ट प्रवृत्ती, एकमेकांवर अविश्वास, उसकी साडी मेरे साडीसे सफेद कैसी ही वृत्ती आणि निराशेच्या गर्तेत जाणे या गोष्टी वाढत चालल्या आहेत. अत्यंत समृद्धीत लोळणारे असोत वा मध्यमवर्ग किंवा गरीब वर्गी असोत, डिप्रेशन वर उपचार घेत आहेत. मानसोपचार तज्ज्ञांकडून. पूर्वी सायकियाट्रिस्ट कडे जाणारा म्हणजे वेडा असे समजायचे. पण आज सायकियाट्रिस्टची अपॉइंटमेंट मिळण्यासाठी रांगेत उभे राहावे लागत आहे आणि ही परिस्थिती अजून बिघडत जाणार आहे. मग काय अशा सत्त्वहीन
समाजाचीच आपण अपेक्षा ठेवायची? आपल्याला काय हवे? कणखर तेजस्वी निर्भय ताकदवान आयुष्य का निराश भययुक्त जीवन? आपल्या प्रत्येकाला आपापल्या समस्या असतात. पण समस्या कोणतीही असो अडचणीला समर्थपणे तोंड देण्यासाठी आतून ताकद असावी लागते. आनंदी, उत्साही, सुखी आयुष्य जगणे हा चमत्कार नसून पराभूत नीराश भययुक्त, दुबळे आयुष्य जगावे लागणे हा चमत्कार आहे. चिंतेची,भयाची, निराशेची जोखडे झुगारून देऊन नव्या उत्साही, आनंदी आयुष्याला सामोरे जाऊ या. कसे? सूर्य रोज ठरलेल्या सेकंदाला उगवतो. त्याला टेन्शन असते? त्याची घाई, गडबड होते? आपल्या शरीरातील श्वसन, पचन, रक्ताभिसरण इत्यादी गोष्टी आपण त्यावर लक्ष ठेवले नाही तरी ठरल्याबर हुकूम चालत असतात. जी वैश्विक शक्ती या सगळ्या गोष्टी तंतोतंत घडवून आणते 
त्याच वैश्विक शक्तीचा एक स्फुल्लिंग प्रत्येकाच्या हृदयात तेवत असतो. त्यातूनच ही शक्ती आपल्यापर्यंत पोहोचते. अडचणीच्या समस्येच्या वेळी या शक्तीच्या उगमापाशी संपर्कात राहणे आपल्याला अवघड जाते अग्निहोत्र हे एक असे साधन आहे जे ह्या शक्ती क्षेत्राशी आपला संपर्क साधून ठेवते. त्या ताकदीशी आपल्याला एकसंध ठेवते. नित्य जीवनात व अडचणीच्या प्रसंगात धैर्याने, डगमगून न जाता, ताकदीने मार्ग काढण्यास मदत करते. हे अग्निहोत्राचे प्रथम महत्त्व आहे. अग्निहोत्राचा शुद्धी कारक परिणाम आपल्या शारीरिक व मानसिक ताकदीला पुष्ट करतो. अशाप्रकारे अग्निहोत्राचा दुहेरी परिणाम आहे. 
 १) अंतर्गत (मन व शरीर) 
२) बाह्य (वातावरण). 
 वैश्विक सामर्थ्याशी प्रत्येक मनुष्यमात्राचा दुवा सांधून देणारे अग्निहोत्र हे एकमेव व तंत्र आहे. हे तंत्र आपल्या मानसिकतेमध्ये बदल घडवून आणते. सूक्ष्म बदल, जो आयुष्यभर कायम राहतो. ही प्रक्रिया नेमकी काय आहे? अग्नीच्या माध्यमातून वायुमंडल शुद्ध करण्याची ही प्रक्रिया आहे. अग्निहोत्र सूर्योदय व सूर्यास्ताच्या निसर्ग चक्राशी एकसंध आहे. अग्निहोत्राने वायूमंडळाला पोषण मिळते आणि शरीर व मन या वरील तणाव कमी होतो, नाहीसा होतो. अग्निहोत्राचा विचार, जाणीव व इच्छाशक्ती यावर त्वरित परिणाम होतो. अग्निहोत्राच्या नित्य आचरणाने आपले विचार प्रेममय होतात. 

हे किरलियन फोटोग्रफी ने सिद्ध केले आहे. मनुष्यच नव्हे तर वनस्पतींभोवतीची Aura वलये अग्निहोत्रा नंतर संघटित होतात. well organised होतात. 

१) आकार अग्निहोत्र करण्यासाठी अर्ध पिरॅमिड आकाराचे तांब्याचे पात्र ही पहिली आवश्यक गोष्ट आहे. तांबे हा धातू ऊर्जेचा उत्तम वाहक आहे. हा धातू ऊर्जा दूर दूर पर्यंत पसरवतो. पिरॅमिड आकारात वैश्विक ऊर्जेचे एकत्रीकरण होत असते. पिरॅमिड हा ग्रीक भाषेतील जोडशब्द आहे. Pyra म्हणजे फायर आणि Amid म्हणजे मध्ये. आपण गायीच्या वंशाच्या गोवर्‍यांचा अग्नी सूर्योदय व सूर्यास्ताला या पिरॅमिड पात्रात तयार करतो. 

२) गाईच्या शेणाच्या गोवर्‍या दुसरा महत्त्वाचा घटक म्हणजे गाईच्या शेणाच्या गोवऱ्या. गायीचे शेण अनेक रोगांमध्ये उपाय म्हणून वापरलेले आहे. गाईच्या शेणाच्या गोवऱ्या जाळल्यानंतर काही जिवाणू विरोधक वायू वातावरणात पसरतात. काही चित्तवृत्ती प्रसन्न करणारे तसेच निराशा दूर करणारे (antidepression agent) वायूही हवेत/ वातावरणात गाईच्या शेणाच्या गोवऱ्या जाळल्यानंतर पसरतात. शरीरात पसरणार्‍या विषाला निरोध करणारे असल्याने आयुर्वेदात गायीचे शेण वेदना दूर करण्यासाठी वापरतात. गाईच्या शेणाच्या धुरामुळे यूफोरियाटिक फिलींग (euphoriatic feeling) म्हणजेच उत्साह वाढतो. टी.बी. सारख्या रोगावर गायीच्या शेणा वर आधारित ट्रीटमेंट स्कँडेनेव्हियासारख्या देशात आजही दिली जाते. काही रोगांवर गाईच्या गोठ्यात राहणे हा उत्तम उपाय समजला जातो. 

३) वेळ तिसरा महत्त्वाचा घटक म्हणजे स्थानिक सूर्योदय-सूर्यास्त या वेळा. योगशास्त्रात यांना संधी समय असे म्हटले आहे. योग शास्त्र सांगते की, ऊर्जा चलनाचे तीन प्रवाह; इडा, पिंगळा व सुषुम्ना संधी समयास आपल्या प्रवहनामध्ये अदलाबदल करतात. आपण नाकपुड्या एकानंतर एक बंद करून हे पाहू शकतो की एका नाकपुडीतून श्वसन दुसऱ्या पेक्षा जास्त मोकळे होत आहे. हे ऊर्जावहन आहे. सहसा सूर्यास्तास उजवीकडून वहन होते तर सूर्योदयास डावीकडे वहन मोकळे असते. असे असते मानवी शरीरातील ऊर्जाचक्र. पण बरोबर सूर्योदय व सूर्यास्त या संधी समयी शरीरातील दोनही नाकपुड्यांमधून ऊर्जेचे वहन होत असते. म्हणजेच निसर्गतःच आपण या वेळांना जास्तीत जास्त ऊर्जा ग्रहण करीत असतो. याच संधी वेळेस अग्निहोत्र करून आपण आपली जाणीव वैश्विक जाणिवेत विलीन करत असतो. संपूर्ण निसर्ग, जीवसृष्टी हे सुद्धा याच संधी समया भोवती जीवन जगत असतात. पक्षी, प्राणी, वनस्पती या सर्वांमध्ये चयापचय बदल याच संधीकाळी होत असतात. अशा प्रकारे सर्व जीव निसर्ग तालाशी निगडित असे जीवन जगत असतात.

 ४) मंत्र चौथा महत्त्वाचा घटक आहे मंत्र. मंत्र म्हणजे विशिष्ट ध्वनिलहरी. विशिष्ट ध्वनिलहरींचा मनावर परिणाम होतो. गोपाळकृष्ण मुरली वाजवीत आणि गाईंना पान्हा फुटे. मिलिटरीमध्ये सैन्य कवायत करतेवेळेस पुलावरून जाताना विस्कळीत होऊन जाते. शिस्तबद्ध पावलांच्या विशिष्ट आवाजामुळे पूल कोसळल्याची उदाहरणे आहेत. असा ध्वनी लहरींचा वातावरणावर परिणाम होतो. 

स्तोत्रपठणाचं महत्व....

ऋषीमुनी-संतांनी स्तोत्र तसंच मंत्रांची निर्मिती करून सर्वसामान्यांवर फार मोठे उपकार केले आहेत. 

कोणत्या अक्षरांची कशी मिळवणी केली म्हणजे कसे ध्वनीतरंग निर्माण होतील व त्याचा मानवाला शारिरीक आणि मानसिक लाभ व अंतःकरण शुद्धीसाठी कसा उपयोग होईल हे विज्ञान लक्षात घेऊनच विशिष्ट अक्षरांची मिळवणी करून ज्या विशिष्ट ध्वनीतरंगाची उन्नती केली ते म्हणजे मंत्र व स्तोत्र. 

स्तोत्रपठणाचं वैशिष्ट्य म्हणजे स्तोत्रातल्या वर्ण-अक्षरांच्या साहाय्याने माणसाच्या शरीरातली निरनिराळी चक्रं जागृत होतात. त्यामुळे शरीरातल्या सुप्त शक्ती जागृत होतात.

आपलं संस्कृत वाङ्मय अतिशय समृद्ध आहे. सर्व भाषांचा उगम संस्कृत भाषेतून झाला असा या भाषेचा लौकिकही आहे. या संस्कृत भाषेला 'गीर्वाणभाषा' म्हणजे देवांची भाषा असंही मानलं जातं. संस्कृत साहित्यात स्तोत्र वाङ्मयाचं एक विशेष स्थान आहे. या साऱ्या वाङ्मयात प्रामुख्याने देवदेवतांची स्तुती केलेली आढळते. उदा. 'रामरक्षा स्तोत्र', अश्वत्थ स्तोत्र, गोविन्द स्तोत्र, 'व्यंकटेश स्तोत्र', 'श्री गणपती अथर्वशीर्ष' आदी स्तोत्रांची नावं घेता येतील. आजही ही स्तोत्रं अनेकांच्या पठणत असलेली आपण पाहतो. केवळ काव्य म्हणून वाचणाऱ्या रसिक वाचकांना ती आनंद देतातच पण देवदेवतांवर श्रद्धा बाळगणाऱ्या श्रद्धावंतांनाही अशा स्तोत्रांचा लौकिक व पारमार्थिक अर्थाने लाभ होतो. त्याचबरोबर आपले उच्चारही सुस्पष्ट होतात.

पूर्वी सकाळ-संध्याकाळ घरोघरी स्तोत्रं म्हटली जात. आज तो काळ मागे पडला आहे. स्तोत्रपठणाचं महत्त्व कमी झालं असलं तरी या स्तोत्रांनी मानवी जीवनात एक अलौकिक स्थान मिळवलं आहे. स्तोत्रपठणाचा विशेष काही उपयोग होत नाही, असं म्हणणारे अनेकजण आहेत. परंतु स्तोत्रपठणाचा उद्देश व त्यामागच्या शास्त्रीय बैठकीचं महत्त्व कळल्यास मनामध्ये कोणताही प्रत्यवाय राहणार नाही.

कोणत्याही गोष्टीची अनुभूती ती गोष्ट प्रत्यक्ष कृतीत आणल्यानंतर येते असा नियमच आहे. लग्न, मुंज अशा काही प्रसंगी आता शांतीपाठ करण्याची आपल्याकडे पद्धत आहे. सत्यनारायणासारख्या पूजाप्रसंगी मंत्रजागर करण्याचा प्रघात हळूहळू नामशेष होत चालला आहे. रूद्राची आर्वतनं करण्याची किंवा दक्षिणा देऊन ब्राह्मणांकडून 'लघुरूद्र' करण्याची रीत बंद पडत चालली आहे. हे शांतीपाठ किंवा मंत्र पठण हा केवळ भाबडेपणाचा भाग नसून याविषयी परदेशातून सूचित करणारे प्रयोग सिद्ध होत आहेत. त्या प्रयोगांवरून हे सर्व सांस्कृतिक आचार-विचार, व्रतवैकल्यांच्या मागे निश्चित वैज्ञानिक बैठक आहे, असं ध्यानी येईल.

डॉ. दोदो आर दो या एका फ्रेंच डॉक्टरने मानसिक शक्तीमापनाचं एक प्रभावी यंत्र शोधून काढलं. ज्याची मानसिक शक्ती मोजायची असेल त्याला दोन ते चार फूट अंतरावर उभं करून त्या यंत्राकडच्या काट्याकडे बघायला सांगण्यात येतं. त्याची दृष्टी स्थिर झाली की यंत्रावरचा काटा गोल फिरू लागतो आणि कोणत्याही डिग्रीवर स्थिर होतो. प्रत्येकाच्या डोळ्यातून विद्युतलहरी बाहेर पडत असतात आणि म्हणून तो काटा फिरतो असं त्यांचं संशोधन आहे. नेमक्या याच तत्वावर स्तोत्रपठणाचा परिणाम मानवी शरीरावर होत असतो.

ज्याप्रमाणे मनामध्ये विचार येतात त्याप्रमाणे विद्युतशक्ती निर्माण होऊन स्तोत्रांमधले शब्दसुद्धा विचाराने भारलेले असल्यामुळे स्तोत्र म्हणणाऱ्याच्या मनावर त्या शब्दसमूहांचा खूप चांगला परिणाम घडतो. स्तोत्राच्या आवर्तनातून आपल्याला अलौकिक, अद्भुत व गूढ अनुभूती येतात हेच स्तोत्रपठणाचं खरं रहस्य आहे. या विधानाच्या पुष्ट्यर्थ
*'रामरक्षा' स्तोत्राचं उदाहरण देता येईल. मंत्रशास्त्राच्या दृष्टीने 'राम' या शब्दाला विशेष महत्त्व आहे. 'र'काराला मंत्रशास्त्रात 'अग्नीबीज' मानतात. 'र' काराच्या उच्चाराने आपल्या शरीरातल्या विद्युतशक्ती जास्त प्रमाणात सुरू होते व त्यामुळे आपल्या शरीरात विद्युतप्रवाह सुरू होतो. 'र'काराची शक्ती अतिशय वेगवान असते हा प्रयोग कोणीही करून पाहण्यासारखा आहे.*

आपल्या पूर्वजांनी सांगितलं आहे की, सकाळी अंथरूणातून बाहेर यायच्या आधी कराग्रे वसते लक्ष्मी। करमध्ये सरस्वती। करमूले तू गोविंदम्। प्रभाते कर दर्शनम्। हा श्लोक म्हणून दोन्ही हात चेहऱ्यावरून फिरवून खाली बेंबीपर्यंत फिरवावेत. असं तीन वेळा करावं. चेहऱ्यावरून हात फिरवताना थोडासा दाब द्यावा. 'अॅक्युपंक्चर विदाऊट नीडल्स' या अमेरिकन पुस्तकातल्या 'अॅक्युप्रेशर ब्रेकफास्ट' या प्रकरणात चेहऱ्यावरचे २५ ते ३० पॉइण्टस दिले आहेत. हे पॉइण्टस लक्षात ठेवून दाबण्यापेक्षा चेहऱ्यावरून हात फिरवल्याने त्याचा फायदा होतो. डोळ्यावरची झापड लगेच जाते आणि आपण एकदम फ्रेश होतो. श्लोक म्हटल्याने सकाळी उठल्यावर देवाचं स्मरण होतं.

संत ज्ञानेश्वरांनी 'ज्ञानेश्वरी'त म्हटलं आहे की बाराखडी म्हटली की त्यात सर्व मंत्र येऊन गेले. ऋषीमुनी-संतांनी स्तोत्र तसंच मंत्रांची निर्मिती करून सर्वसामान्यांवर फार मोठे उपकार केले आहेत. कोणत्या अक्षरांची कशी मिळवणी केली म्हणजे कसे ध्वनीतरंग निर्माण होतील व त्याचा मानवाला शारिरीक आणि मानसिक लाभ व अंतःकरण शुद्धीसाठी कसा उपयोग होईल हे विज्ञान लक्षात घेऊनच विशिष्ट अक्षरांची मिळवणी करून ज्या विशिष्ट ध्वनीतरंगाची उन्नती केली ते म्हणजे मंत्र व स्तोत्र. स्तोत्रपठणाचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे स्तोत्रातल्या वर्ण-अक्षरांच्या साहाय्याने माणसाच्या शरीरातली निरनिराळी चक्रं जागृत होतात. त्यामुळे शरीरातल्या सुप्त शक्ती जागृत होतात. सामान्यतः माणूस त्याच्या एकूण शक्तीच्या १० टक्के शक्ती वापरत असतो. ९० टक्के शक्यतो सुप्तावस्थेच असते. ती शक्ती स्तोत्रपठणाने जागृत करता येते. पण त्यासाठी पद्मासनात बसून एकाच वेळी, एकाच ठिकाणी आणि योग्य उच्चारात स्तोत्रपठण केलं पाहिजे. स्तोत्रपठणाचा ज्यांना खरोखर अनुभव घ्यायचा आहे त्यांना ही सर्व पथ्यं काटेकोरपणाने पाळावीच लागतात. अन्यथा शास्त्रोक्त पद्धतीने स्तोत्रांचं पठण केलं नाही तर मग त्यांची प्रचिती कशी येणार?
आपल्या तोंडात, टाळूवर ८४ रेखावृत्तीचे बिंदू असतात. पूर्वी श्रेष्ठता प्राप्त झालेल्या काही व्यक्ती प्रदीर्घ तपस्येमध्ये मग्न झाल्या. त्या लोकांनी कालांतराने काही ध्वनी निर्माण करण्यास सुरुवात केली व असं करताना त्यांची जीभ टाळूवर असलेल्या रेखावृत्तांच्या बिंदूमधल्या विशिष्ट स्थानी टेकवली व त्यामधून विशिष्ट नादनिर्मिती झाली. आपण बोललेल्या प्रत्येक शब्दांच्या किंवा मंत्राच्या उच्चारामुळे मंत्रातल्या प्रत्येक शब्दाचा आघात शरीराच्या कोणत्याही भागावर होत असतो. योग्य प्रकारचे आघात झाले तर शरीरातले हायपोथॅलम्स, थॅलम्स अथवा पिच्युटरी ग्रंथीवर परिणाम होऊन अत्यानंदाच्या मनःस्थितीत आपण येतो.

ज्या वास्तूमध्ये नेहमी अभद्र बोलणं, वरच्या पट्टीत किंचाळून बोलणं, नकारात्मक बोलणं होत असेल अशा वास्तूमध्ये तुम्ही प्रवेश केल्यावर तिथलं वातावरण मनावर भार निर्माण करणारं व नैराश्यपूर्ण वाटेल. पण त्याऐवजी जिथे गाण्यांचे सूर, स्तोत्रपठण, वैचारिक पातळीची चांगली देवाणघेवाण, मंत्रोच्चार होत असतील, मनाला उल्हासित करणारं संभाषण चालू असतं त्या वास्तूत उत्साहपूर्ण, तणावरहित व मनमोकळे, प्रसन्न वाटेल.
तुम्हाला येणारा अनुभव निर्माण होणाऱ्या भावना यांचा नादशास्त्राशी खूप जवळचा संबंध आहे. आपल्या भावना उल्हासित होतील, नैराश्यातून आनंदाकडे नेतील असे शब्द निवडून प्रत्येक मंत्र, श्लोक, स्तोत्र रचले होते. आपण म्हटलं तर मेंदूच्या काही भागांना उत्तेजन मिळाल्याने मेंदूचं रासायनिक संतुलन बदलतं. ही बदललेली मेंदूची रासायनिक स्थिती आपल्या मनाला अधिक सुखावह, तणावमुक्त व उदार बनवते. मनाचा मोठेपणा वाढवून परिस्थितीबाबत अधिक उदार दृष्टिकोन निर्माण करते.
आज आपण कठीण काळातून जात आहोत. सर्व भौतिक सुखं हात जोडून आपल्यासमोर उभे आहेत. तरीही सध्याचं जीवन अनेक समस्यांनी ग्रासलेलं आहे. नित्यनवीन संकटं त्यात भर घालत आहेत आणि आपलं जीवन तणावपूर्वक बनलं आहे. विज्ञानामुळे मानवाची पावलं चंद्रावर पोहोचली असली तरी त्याच्या मनाला अजूनही शांती लाभलेली नाही.

शांती, समाधान, उत्कर्ष, उन्नतीसाठी कशाची गरज असते तर ती मानसिक समाधानाची. यासाठी रोज १५ ते २० मिनिटं एकाग्र चित्ताने स्तोत्रपठण केलं तर निश्चितच मानसिक समाधान मिळेल व चांगले आरोग्यही प्राप्त होईल.

५) आहुती यानंतर ची गोष्ट म्हणजे आहुती. दोन चिमूट कच्चे, अखंड तांदूळ व गाईचे काही थेंब एकत्र मिसळून, त्याचे दोन भाग करून त्याच्या दोन आहुती दिल्या जातात. जेव्हा तांदूळ अखंड, अक्षत नसतो तेव्हा जरी त्याची रासायनिक बांधणी समान असली तरी सूक्ष्म ऊर्जेची बांधणी अर्धवट तांदुळात नष्ट झालेली असते. तांदूळ जगाच्या पाठीवर सर्व ठिकाणी उपलब्ध असतो. गाईचे तूप प्रथिन युक्त असते. गाईचे तूप औषधी गुणधर्माने युक्त आहे. गाईच्या तुपाचे ज्वलन होताना त्याचे औषधी गुणधर्म वातावरणात पसरतात. यामुळे वातावरण शुद्ध होते. करण्याची पद्धत स्थानिक सूर्योदय व सूर्यास्त यावेळी गायीच्या गोवर्‍यांचे अग्नीचे पात्रात निर्धूम (धूर विरहित) प्रज्वलन करावे. 

अखंड तांदळास काही थेंब तूप माखून दोन भाग करून ठेवावे. बरोबर सूर्योदय/सूर्यास्ताची वेळ झाली की दोन मंत्र म्हणून दोन आहुती द्याव्या. सूर्योदयाचे वेळी हे मंत्र म्हणावेत. सूर्याय स्वाहा,सूर्याय इदम् न मम। (स्वाहा म्हणल्यावर पहिली आहुती अग्नीमध्ये सोडावी). प्रजापतये स्वाहा, प्रजापतये इदम् न मम। (स्वाहा म्हटल्यावर दुसरी आहुती अग्नीमध्ये सोडावी). सूर्यास्ताच्या वेळी हे मंत्र म्हणावेत अग्नये स्वाहा, अग्नये इदम् न मम। (स्वाहा म्हटल्यावर पहिली आहुती अग्नीमध्ये सोडावी) प्रजापतये स्वाहा, प्रजापतये इदम् न मम। (स्वाहा म्हटल्यावर दुसरी आहुती अग्नीमध्ये सोडावी) आहुती भस्म होईपर्यंत 2-5 मिनिटे उघड्या डोळ्याने अग्नी कडे लक्ष देऊन स्वस्थ बसून रहावे. जाणीवपूर्वक स्वतःचा अग्नी रूपात असणाऱ्या परमात्म्याशी वैयक्तिक संपर्क साधावा. हे आहे परिस्थिती व भावनांना दुरुस्त करण्याचे सुधारण्याचे सूत्र. अग्निहोत्र आचरणाने वातावरणात इतकी ऊर्जा भरली जाते की त्याच्या संपर्कात येणारी प्रत्येक गोष्ट दुरुस्त होते. वेदांमध्ये अग्निहोत्रास नित्य कर्म म्हटले आहे. अग्निहोत्राने व्यक्तीचा वैश्विक ऊर्जेशी संपर्क साधला जातो. आपल्यामध्ये हळूहळू सूक्ष्म बदल घडत जाऊन आपण मनाच्या उच्च अवस्थेमध्ये पोचतो. 

आपली जाणीव, आपले ऊर्जा क्षेत्र उंचावले तर जातेच पण त्याच वेळी वातावरण शुद्धी झाल्याने समाजाच्या कल्याणाचे कार्यही हातून घडते. म्हणूनच अग्निहोत्रास सर्वोत्तम कर्म म्हटलेले आहे. आपण फक्त आपलेच भले करत नसून संपूर्ण पृथ्वीसाठी सकारात्मक काम करत असतो. सर्वांच्या भल्यासाठी प्रार्थना आहे ही आपले शरीर हे आपल्या मनाचे प्रकटीकरण आहे. जेंव्हा जेंव्हा आतील भावनिक मनात असंतुलन होते, तेंव्हा तेंव्हा शरीरावर विपरित परिणाम झालेला दिसून येतो. 

आपल्या आतील उर्जेचा स्त्रोत व आपले शरीर यांचे कार्यात बिघाड निर्माण होऊ लागतो. आपले मन हे शरीरा पुरते मर्यादित नसून संपूर्ण विश्वाशी एकसंध असते. म्हणून मनात किंवा भावनिक विश्वात काहीही बदल न करता आपण शारीरिक उपाय औषधे इत्यादी फक्त करत राहिलो तर आजार किंवा रोग बरा होत नाही. आधुनिक विज्ञान पण हेच सांगत आहे की मनाचा शारीरिक संतुलनावर, आरोग्यावर परिणाम होतो. आपल्याला आपण कोण आहोत, काय करू शकतो हेच माहीत नसल्याने आपण रोगट, चिंतामय, दुःखी, तणावपूर्ण आयुष्य जगत असतो. यावर अग्निहोत्र हा साधा पण दिव्य असा उपाय आहे आणि मग हे नवीन जग आपलेच आहे. आपल्याला स्वतःच्या क्षमतांची ओळख, आपल्या शक्तीच्या उगमाची ओळख आणि स्वतःची ओळख या छोट्याशा क्रियेने घडते. अग्निहोत्र हे शारीरिक स्तरावर तर परिणाम करतेच पण मानसिक व आत्मिक स्तरापर्यंत याचे जबरदस्त परिणाम दिसून येतात. 

अशा प्रकारे आपल्याला शारीरिक स्तरावर तर उपयोग होतोच पण मानसिक, भावनिक व आत्मिक स्तरांवरही सकारात्मक बदल घडून येतात. आपला आपल्या स्वतःशीच दुवा सांधला जातो. असा आहे हा दुवा. शक्ती/उर्जा व कार्य यातील सांधा

No comments:

Post a Comment