१
दीन पतित अन्यायी । शरण आले विठाबाई ।। १ ।।
मी तो आहे यातीहीन । न कळे काही आचरण ।। २ ।।
मज अधिकार नाही । शरण आले विठाबाई ।। ३ ।।
ठाव देई चरणापाशी | तुझी कान्होपात्रा दासी ।।४।।
२
वर्म वैरियाचे हाती । देऊ नको श्रीपती ।।१।।
तू तो अनाथाचा नाथ । दीन दयाळ कृपावंत ।।२।।
वेद पुराणे गर्जती । साही शास्त्रे विवादती ।।३।।
चरणी ब्रिद वागविसी । तुझी कान्होपात्रा दासी ।।४।।
३
जीवीचे जिवलगे माझे कृष्णाई कान्हाई ।
सांवळे डोळसे करुणा येऊ दे कांही ।। १ ।।
आला अपवाद याती संबंध लौकिक पाही ।
सावळे डोळसे करुणा येऊ दे काही || २ ||
दीनोद्धार ऐसे वेदशास्त्रे गर्जती पाही ।
सावळे डोळसे करुणा येऊ दे काही ॥३॥
शरण कान्होपात्रा तुजला वेळोवेळा पाही ।
सावळे डोळसे करुणा येऊ दे काही ।।४।।
४
माझे माहेर पंढरी । सुखे नांदू भीमातीरी ।।१।।
येथे आहे मायबाप । हरे ताप दरुशने ।।२।।
निवारिली तळमळ चिंता । गेली व्यथा अंतरीची ।।३।।
केशी विटेवरी शोभली । पाहुनी कान्होपात्रा धाली ।।४।।
५
नको देवराया अंत आता पाहू ।प्राण हा सर्वथा फुटो पाहे ।।१।। हरिणीचे पाडस व्याघ्रे धरियेले ।मजलागी जाहले तैसे देवा ।। २ ।। तुजवीण ठाव न दिसे त्रिभुवनी ।धावे हो जननी विठाबाई ।।३।। मोकलोनी आस जाहले उदास ।घेई कान्होपात्रेस हृदयात ।।४।।
६
घ्या रे घ्या मुखी नाम ।अंतरी धरोनिया प्रेम ।।१।।
माझा आहे भोळा बाप ।घेतो ताप हरोनि ।।२।।
आपुलिया नामासाठी ।धावे संकटी लवलाहे ।।३।।
घ्यारे घ्यारे अनुभव ।कान्होपात्रेचा माधव ।।४।।
७
योग याग तपे करिता भागली ।तीच ही माऊली विटेवरी ।।१।। न येई ध्यानी साधिता साधनी ।भक्तासी निर्वाणी धावतसे ।।२।। चारी वेद साही शास्त्रे शिणली ।कान्होपात्रा लाधली प्रेमसुखे ।।३।।
८
आलंकापुरी पुण्यठाव ।तेथ समाधी ज्ञानदेव ।।१।।
पांडुरंगें दीधला वर ।भेटी निर्धार कृष्णपक्षीं ।।२।।
नित्य स्नानालागीं जाणा ।भागीरथी दिधली ज्ञाना ।।३।।
सरस्वती मणिकर्णिका ।त्रिसंगमीं वाहती देखा ।।४।।
येथें स्नान करितां ।वास वैकुंठीं तत्त्वतां ।। ५ ।।
ऐसे देव सांगता ।कान्होपात्रा आनंदता ।।६।।
९
शिव तो निवृत्ति विष्णु ज्ञानदेव पाही ।सोपान तो ब्रह्मा मूळ माया मुक्ताई ॥१॥धन्य धन्य धन्य धन्य निवृत्तीराया ।धन्य ज्ञानदेव सोपान सखया ।।२।।प्रत्यक्ष पैठणीं भटां दाविली प्रचिती ।रेडियाचे मुखें वदविली वेदश्रुती ||३||चौदाशे वरुषचे तप्ती तीर रहिवाशी ।गर्व हरविला चालविले भिंतीशी ।।४।।धन्य कान्हुपात्रा आजी झाली भाग्याची ।भेटी झाली ज्ञानदेवाची म्हणूनीया ।। ५ ।।
१०
सकळही सुरवर येथेंची लाधले ।देवचें देखिले चरणांबुज ।। १ ।।हरली ती भूक तहान निमाली ।संतांची देखिलीं चरणांबुजें ।।२।।किर्तनाचे रंगी आनंदें नाचतां ।कान्होपात्र चित्ता समाधान ।।३।।
११
अगावैकुंठींच्या राया ।अगा विठ्ठल सखया ।।१।।

अगानारायणा ।अगा वसुदेवनंदना ।।२।।
अगापुंडलीक वरदा ।अगा विष्णु तूं गोविंदा ।।३।।
अगारखुमाईच्या कांता ।कान्होपात्रा राखी आतां ।।४।।
१२
पतित तूं पावना ।म्हणविसी नारायणा ।। १ ।।तरी सांभाळीं वचना ।ब्रीद वागविसी जाणा ।। २ ।।याती शुद्ध नाही भाव।दुष्ट आचरण स्वभाव ।।३।।मुखीं नाम नाहीं ।कान्होपात्रा शरण पायी ।।४।।
१३
माझ्या जीवींचे जीवन ।तो विठ्ठल निधान ।।१।।उभा असे विठेवरी ।वांटी प्रेमाची सीदोरी ।।२।।आलीयाची धनी ।निवारितो चक्रपाणी ।।३।।भेटा दयेच्या सागरा ।विनवितसे कान्होपात्रा ।।४।।
१४
अंबऋषीसाठी ।जन्म घेतलें जगजेठी ।। १ ।।वागदी भक्तांचा आभार ।ऋणी झाला निरंतर ।। २ ।।अर्जुनाचे रथीं बैसे ।त्याचे घोडे धुतसे ।।३।।लाज सांडी ऋषीकेषी ।कान्होपात्रा तुझी दासी ।।४।।
१५
ज्यांचे घेतां मुखीं नाम ।धाकीं पडे काळ यम ।।१।।ऐशी नामाची थोरी ।उद्धारिले दुराचारी ।। २ ।।नष्ट गणिका आजामेळा ।वाल्मिकी झाला तो सोज्वळ ।। ३ ।।ऐशी नाम माळा ।कान्होपात्रा ल्याली गळा।।४।।
१६
विठू दीनांचा दयाळ ।वागवी दासाची कळकळ ।।१।।देव कृपावंत मोठा ।उणें पडों नेदी तोटा ।।२।।देव भक्तांचा अभिमानी ।वाहे चिंता सकळ मनीं ।।३।।देव भावाचा भुकेला ।कान्होपात्रा आनंद झाला ।।४।।
१७
कनवाळू कृपाळू तूं माय माऊली ।धावुनियां भेटली विठाबाई ।।१।।निवारिलीं विघ्नें दुरी तें पळालीं ।जोडुनियां कर विठाई विनविली ।।२।।शरण कान्होपात्रा चरणीं निमाली।बांधोनियां भेटली विठाबाई।। ३ ।।
१८
ज्ञान वैराग्य भजलीं न तुमतें ।आमुतें पंढरीनाथें न विसरीजे ।।१।।दंभ प्रपंच भजली न तुमतें ।आमुतें पंढरीनाथें न विसरीजे || २ ||विनवी कान्होपात्रा पंढरीरायातें ।आमुतें पंढरीनाथे विसरीजे ।।३।।
१९
हरीहर बह्मादिक ।जयालागीं करिती तप ।।१।।तो हा पंढरीचा राणा ।न ये अनुमाना श्रुतीसी ।। २ ।।शास्त्रे पुराणें आंबावली ।चारीं मौन्यची राहिलीं ।।३।।पुंडलीक वरदायिणी । कान्होपात्रेचा जो धनी ।।४।।
२०
विषयाचे संगतीं ।नाश पावलें निश्चिती ।। १ ।।भगें पडली इंद्राला ।भस्मासूर भस्म झाला ।। २ ।।चंद्रा लागला कलंक ।गुरुपत्नीसी रतला देख ||३||रावण मुकला प्राणासी ।कान्होपात्रा ह्मणे दासी ।।४।।
२१
जन्मांतरीचें सुकृत आजी फळांसी आलें ।ह्मणोनी देखिले विठ्ठलचरण ।।१।।धन्यभाग आजी डोळिया लाधलें ।म्हणुनी देखिले विठ्ठलचरण ।। २ ।।धन्य चरण माझे या पंथ चालिले ।म्हणुनी देखिले विठ्ठल चरण ।।३।।येऊनिया देहासी धन्य झाले ।म्हणुनि देखिले विठ्ठलचरण ।। ४ ।।घाली गर्भवासा कान्होपात्रा म्हणे ।जन्मोजन्मीं देखेन विठ्ठलचरण ।। ५ ।।
२२
सर्व सुखाचे जें निजसुखाचें सार गे माय ।तो हा पंढरिराया विटेवरी ।।१।।सकळ साराचें सार गे माय ।तो हा पंढरिराय विटेवरी ।।२।।सर्व साधनाचें जें कां निजसाधन ।गे माय तो हा पंढरिराय विटेवरी ।।३।।जे कां जीवांचे जीवन कान्होपात्राचे ।निजघन ते माय तो हा पंढरीराय विटेवरी ॥४॥
२३
पतित पावन ह्मणविसी आधी ।तरी का उपाधि भक्तांमागें ।।१।।तुझे म्हणवितां दुर्जे अगसंग ।उणेपणा सांग कोणाकडे ।।२।।सिंव्हाचें भातुकें जंबुक पे नेतां ।थोराचिया माथां लाज वाटे ।।३।।ह्मणे कान्होपात्रा देह समर्पण करवा ।जतन ब्रिदासाठी ॥४॥
२४
नामें दोष जळती ।नामें पापी उद्धरती ।। १ ।।हें आलें अनुभवा ।सत्यजीवा प्रत्यया ।।२।।नामें अपार तारिलें ।नामें जीवनमुक्त केले ।।३।।कान्होपात्रा नाम घेतां ।पायीं जडली तत्त्वतां ।। ४ ।।

संत कान्होपात्रा अभंग समाप्त

No comments:
Post a Comment