धन्य धन्य हो प्रदक्षिणा सदगुरु रायाची.. एक नितांत सुंदर भजन..========================== =====
धन्य धन्य हो प्रदक्षिणा सदगुरु रायाची,
झाली त्वरा सुरवरा विमान उतरायाची ||
पदोपदी अपार झाल्या पुण्याच्या राशी
सर्वही तीर्थही घडली आम्हा आदिकरुनी काशी ||
मृदंग-टाळ-ढोल-भक्त भावार्थ गाती
नामसंकीर्तने ब्रम्हानंदे नाचती ||
कोटी ब्रम्हहत्या हरती करिता दंडवत
लोटांगण घालिता मोक्ष लोळे पायात ||
गुरुभजनाचा महिमा न कळे आगमा-निगमांसी
अनुभव ते जाणती जे गुरुपदिंचे रहिवासी ||
प्रदक्षिणा करुनी देह भावे वाहिला
श्रीरंगात्मज विठ्ठल पुढे उभा राहिला ||
......श्री रंगात्मज विठ्ठल
No comments:
Post a Comment